kangna and sanjay raut

गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरु आहे. राज्य सरकारवर टीका होत आहे. कंगनाने  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. तसेच विरोधकांकडूनही टीका होत आहे. याविषयी शिवसेना नेते खासदार संजय राऊत(sanjay raut) यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याला राऊत यांनी त्यांच्या खास अंदाजात उत्तरे दिली.

पत्रकार आशुतोष यांनी खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. आशुतोषने म्हटले की, प्रश्न विचारतोय. वाईट वाटून घेऊ नका. उत्तर द्या. एक काळ होता जेव्हा लोक म्हणायचे की मुंबईत, महाराष्ट्रात बाळासाहेबांविरोधात कुणी एक शब्द बोलू शकत नव्हते . आज उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल एका टिव्हीचा संपादक  ज्या प्रकारची भाषा वापरत आहे, एक अभिनेत्री कंगना रणौत जसं बोलतेय,हे  पाहता तुम्हाला वाटत का शिवसेना कमजोर झाली आहे?

यावर उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, शिवसेना कमकुवत झाली नाही. शिवसेना आता सत्तेत आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईलच. आमचे लोक  रागात आहेत.  जेव्हा विरोधी बाकांवर होतो, तेव्हा एका इशाऱ्यावर लोक रस्त्यावर उतरत होते. जे वाटेल ते आम्ही करायचो. माझ्यावर १४० पेक्षा जास्त खटले सुरू आहेत. आम्ही घाबरणारे लोक नाही . पुढेही घाबरणार नाही. सत्ता येते. सत्ता जाते. सत्ता घेऊन कुणीही येत नाही, आम्हीही राहणार नाही. सगळ्यांना जावं लागणार आहे. सोडावी लागणार आहे. जे आमच्यावर भुकंत आहेत, त्यांनाही माहिती आहे. भीती तर त्यांच्या मनात आहे. ते फक्त वरून दाखवत आहेत. पण, जेव्हा वेळ येईल, तेव्हा आम्हीपण सांगू. आम्ही काहीही विसरलेलो नाही. आमचा अपमान कधीही विसरणार नाही. हा महाराष्ट्र आहे, असे संजय राऊत म्हणाले.