Mamata Banerjee

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा(J.P. Nadda) तसेच इतर भाजपा नेत्यांवर झालेला हल्ला आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड(governor jagdeep dhankhad) यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(mamata banerjee) यांना फटकारलं आहे.

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा(j p nadda) तसेच इतर भाजपा नेत्यांवर झालेला हल्ला आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना फटकारलं(governor jagdeep dhankhad slams cm mamata banerjee) आहे. जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याचं राज्यपालांनी म्हटले आहे. पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था गेल्या अनेक काळापासून खालावत चालली आहे. परिस्थिती चिंताजनक पातळीवर आहे, असंही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

राज्यपाल पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी घटनात्मक बांधील आहेत. त्यांना घटनेचं पालन करावंच लागेल . राज्यातील ढासळत्या कायदा सुव्यवस्थेसाठी राज्यपालांनी ममता बॅनर्जी सरकारला जबाबदार ठरवलं आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांनी बाहेरचे उल्लेख करत भाजपासंबंधी केलेल्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना म्हटले की, भारतीयांना बाहरेचे बोलत आहेत का ? मुख्यमंत्री मॅडम आगीशी खेळू नका.

ते पुढे म्हणाले की, काल जे झालं ते फार दुर्दैवी होती. लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तेदेखील राज्यातील नेत्यांना न घाबरता,..पण गुरुवारी तसं झालं नाहीयावेळी त्यांनी जे पी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर हल्ला करणारे राज्य सरकारचं समर्थन असणारे होते असा गंभीर आरोपही केला. माझी ममता बॅनर्जींना विचार करावा अशी विनंती आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याची मी गंभीर दखल घेतली आहे. कायदा आणि राज्यघटनेवर विश्वास असणारी मुख्यमंत्री असं वक्तव्य कसं काय करु शकते?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे. बंगाली संस्कृतीचा विचार करुन आपण माफी मागा,असं आवाहन त्यांनी केलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी भाजपा नेत्यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर हे सर्व नाटक असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान राज्यपालांनी आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं सांगितलं आहे.