kalyan banerji touches cheek of a woman

तृणमूल काँग्रेसच्या (TMC mla viral video) खासदारानं एका महिला आमदारासोबत भर पत्रकार परिषदेत विचित्र प्रकार(TMC mla touches cheek of woman mla) केला आहे. कल्याण बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ नुकताच खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे भाजपने बॅनर्जी यांना धारेवर धरलं आहे.

    नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी(west Bengal election) अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत बंगालमधला एक व्हिडिओ(viral video of kalyan banerji) समोर आला आहे.

    तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदारानं एका महिला आमदारासोबत भर पत्रकार परिषदेत विचित्र प्रकार(TMC mla touches cheek of woman mla) केला आहे. कल्याण बॅनर्जी यांचा एक व्हिडिओ नुकताच खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे भाजपने बॅनर्जी यांना धारेवर धरलं आहे.

    भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेतील खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. यात एका पत्रकार परिषदेमध्ये तृणमूल काँग्रेस (टीएमसी)चा एक खासदार पक्षातील एका महिला आमदाराचा गाल ओढत असल्याचं दिसत आहे.

    लॉकेट चॅटर्जी यांनीच आपल्या ट्विटमध्ये हे नेते म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार कल्याण बॅनर्जी असल्याचं सांगितलं.चॅटर्जींनी ‘टीएमसी अशाच प्रकारे महिला सक्षमीकरण करत आहे की काय?’ असा प्रश्न विचारला आहे. ‘हे टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी. हे बांकुराच्या आमदाराचा गाल ओढत आहेत. बांकुराची आमदार तिकीट न मिळाल्यानं नाराज होती. अरे, लाज वाटली पाहिजे!’

    पश्चिम बंगालमध्ये ऐन निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच हा व्हिडिओ आला आहे. अर्थात हा व्हिडिओबाबत अजुन कोणते स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.