Dadra Nagar Haveli MP Mohan Sanjibhai Delkar's suicide note names Gujarat officials and former ministers

दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी(mohan delkar death) काही दिवसांपुर्वी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या(mohan delkar suicide) केली होती. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोट(mohan delkar suicide note) सापडली.

    मुंबई: दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी(mohan delkar death) काही दिवसांपुर्वी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली.

    आत्महत्या करण्यापूर्वी डेलकर यांनी गुजराती लिहिलेल्या १६ पानी सुसाईड नोटमध्ये पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भाजपचे नेते व गुजरातचे माजी गृहमंत्री व दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. प्रफुल्ल पटेल भाजपचे मोठे नेते असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे आहेत. त्यामुळे सखोल चौकशी करण्याची मागणी सावंत यांनी केली होती.गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ती मान्य केली आहे. देशभरातील विविध राज्यात विरोधी पक्षाचे नेते आमदार, खासदारांना व सरकारांना अशाच प्रकारचा त्रास दिला जात आहे.

    डेलकर हे सी ग्रीन साउथ हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील रूममध्ये थांबले होते. सकाळी ११ वाजता त्यांच्या ड्रयव्हरने फोन केला. मात्र, अनेकदा फोन करुनही त्यांनी कॉल न उचलल्याने ड्रायव्हरने याबाबत त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. कुटुंबियांनीही त्यांना फोन केले. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनीही कॉल केले. मात्र, काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर रूमच्या दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला.

    दरवाजा न उघडल्याने दुपारी १२च्या सुमारास याबाबत हॉटेलकडून पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार, मरिन ड्राइव्ह पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले. दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. डेलकर यांच्या चालकाने बाजूच्या विंगमधील पाचव्या मजल्यावरील गॅलरीतून त्यांच्या गॅलरीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यात तो खाली कोसळणार होता. हे त्याच्या जिवावर बेतले असते. मात्र मालकाकडे जाण्यासाठी त्याची धडपड सुरू होती. अखेर तो गॅलरीत उडी घेण्यात यशस्वी झाला. त्यावेळी डेलकर हे शालच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.

    या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. डेलकर हे सात वेळा खासदार होते. तणावातून त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुसाईड नोटमधील माहितीबाबत पोलिसांनी गुप्तता पाळली आहे.