बिल्डिंग हलत असताना ‘त्याने’ वाचवले अनेकांचे प्राण

महाड:  महाडमध्ये काल ५ मजली इमारत कोसळली. मात्र काल कोसळण्याआधी जेव्हा बिल्डिंग हलत होती तेव्हा स्वप्नील शिर्के हा  तरुण इमारतीच्या ए विंगमध्ये धावत वरच्या बाजूस गेला. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याने दहा ते पंधरा जणांना बाहेर काढले. त्यानंतर आता इमारत जास्त वेळ टिकू शकणार नाही हे स्वप्निलच्या लक्षात येताच स्वप्नीलने इमारतीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या पायावर विटांचा ढिगारा पडून गंभीर दुखापत झाली. त्याला अधिक उपचारासाठी महाडमधील रानडे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे त्याच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.