“४०० खासदार वाले मोदी ४ खासदारांच्या पवारांचे सल्ले कशाला घेतील” : सदाभाऊ खोत

“मोदी सरकार ठामपणे काम करत असून त्यांना असल्या सल्लागारांची आवश्यकता नाही. चार खासदार वाल्यांचे सल्ले घेवून सरकार येत नाही. आमच्या गावात मांडवला टेकूसुध्दा त्या पेक्षा जास्त असत्यात. हेच स्वत: जावून भेटतात आणि बाहेर वातावरण तयार केले जाते की त्यांनी बोलावले आम्ही सल्ला दिला.” आम्ही हे नेहमी बघितले आहे असे खोत यांनी सांगितले.

    महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना फुशारकी मारण्याची सवय झाली आहे. पवार साहेबांनी मोदी साहेबांना भेटून सल्ला दिला अश्या बातम्या पसरवण्यात येत आहेत. मात्र ज्यांनी चारशे खासदार निवडून आणून सरकार बनवले ते चार खासदार वाल्यांचे सल्ले कश्याला घेतील? असा सवाल माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित केला आहे.

    राज्य सरकार सहकार आणि कृषी कायदा सुधारणा विधेयक मांडून पुन्हा एकदा हा विषय केंद्र सरकारच्या माथी मारण्याच्या तयारीत आहे. असा आरोप करत खोत म्हणाले की, “केंद्र सरकारचे कृषी कायदे लागू करून राज्यातील शेतक-यांचे हित होवू द्यायचे नसल्यानेच ही कायद्याची तरतूद कॉंग्रेस आघाडीचे सरकार करत आहे. त्यासाठीच पंतप्रधान मोदी यांना भेटून सल्ले दिल्याच्या बातम्या दिल्या जात आहेत.

    “मोदी सरकार ठामपणे काम करत असून त्यांना असल्या सल्लागारांची आवश्यकता नाही. चार खासदार वाल्यांचे सल्ले घेवून सरकार येत नाही. आमच्या गावात मांडवला टेकूसुध्दा त्या पेक्षा जास्त असत्यात. हेच स्वत: जावून भेटतात आणि बाहेर वातावरण तयार केले जाते की त्यांनी बोलावले आम्ही सल्ला दिला.” आम्ही हे नेहमी बघितले आहे असे खोत यांनी सांगितले.

    “राज्य सरकार सारे काही केंद्राकडे मागते आहे. मराठा ओबीसी सारे प्रश्न केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. हे केवळ भ्रम तयार करण्याचे राजकारण आहे. महाविकास आघाडी ही अलिबाबा आणि चाळीस चोर अशी टोळी आहे.” अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.