wife swapping

अहमदाबादमधील एका महिलेने नवऱ्यावर आणि सासू-सासऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेने नवऱ्यावर फसवणुकीचा तसेच वाईफ स्वॅपिंगचाही(wife swapping) आरोप केल्याची माहिती मिळाली आहे.

अहमदाबादमधील एका महिलेने नवऱ्यावर आणि सासू-सासऱ्यांवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेने नवऱ्यावर फसवणुकीचा तसेच वाईफ स्वॅपिंगचाही(wife swapping) आरोप केल्याची माहिती मिळाली आहे. नवरा वाईफ स्वॅपिंगसाठी जबरदस्ती करत होता, अखेर या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली.

महिलेने आपल्या आरोपामध्ये म्हटले आहे की, नवरा आपल्यावर त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करतो. याला वाईफ स्वॅपिंग म्हणतात.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे २००४ साली लग्न झाले होते. त्यांना ११ वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. लग्नानंतर काही वर्ष सर्व काही ठिक होते. मात्र २०१७ साली तिला नवऱ्याचे दोन महिलांसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे समजले.मग दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. नवरा आपल्यावर वाईफ स्वॅपिंगतंर्गत त्याच्या मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करायचा, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. मी नकार दिल्यानंतर मला काहीही बोलायचा. तसेच मला चरित्रहिन ठरवून मोकळा व्हायचा, असे महिलेने म्हटले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात त्याने मुलाला नातेवाईकाकडे पाठवून दिले व पत्नीकडे घटस्फोटाची मागणी केल्याचे तिने आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.