भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुदतीला अद्याप ३६ तास शिल्लक

दोन दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांत पहा, कोण आजी आणि कोम माजी राहील, असे सबचक वक्तव्य केले होते. शुक्रवारीही त्यांना या विधानाबाबत विचारले असता, त्यांनी अद्याप ४८ तास शिल्लक असल्याचे सांगितले होते.

  मुंबई- राज्यात पुन्हा कदा शिवसेना आणि भाजपातील जवळीक वाढायला लागली आहे का, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी औरंगाबादमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा उल्लेख माजी आणमि एकत्र आल्यास भावी सहकारी असा केला होता. त्यानंतर दानवेंनीही असे झाल्यास शिवसेना-भाजपाचे मतदार खूश होतील, असे म्हटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या भावी सहकाऱ्याच्या वक्तव्यानं राज्याच्या राजकीय गटात मात्र चर्चा सुरु झाल्या आणि त्याच्या प्रतिक्रियाही उमटल्या.

  राऊतांनी केले मोदींचे कौतुक

  मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर, शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींच्या उंचीचा कही नेता सध्या देशात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर भाजपाला शिखरावर नेण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केल्याचे त्यांनी म्हटले. यापूर्वी भाजपा इतर पक्षांना सोबत घेऊन आघाडी सरकार स्थापन करीत असे, आता मोदींच्या कार्यकाळात भाजपाला पूर्ण बहुमत मिळाल्याचे सांगत, त्यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले होते.

  अजून ३६ तासांचा कालावधी आहे- चंद्रकांत पाटील

  दोन दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीन दिवसांत पहा, कोण आजी आणि कोम माजी राहील, असे सबचक वक्तव्य केले होते. शुक्रवारीही त्यांना या विधानाबाबत विचारले असता, त्यांनी अद्याप ४८ तास शिल्लक असल्याचे सांगितले होते. तीन दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य आणि त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला भावी सहकारी असा उल्लेख, यामुळे राज्याच्या राजाकारणात वेगळं काही घडणार का, याची उत्सुकता सहगळ्यांना आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या मुदतीला अजून ३६ तास शिल्लक आहेत, त्यामुळे या ३६ तासांत काय घडणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  राजकारणात काहीही शक्य- देवेंद्र फडणवीस

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर, भाजपाचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी या वक्तव्याचं स्वागत केलय. मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा असल्याचं सांगत, त्यांनी राजकारणात काहीही शक्य असल्याचं म्हटलं आहे. महाविकास आघाडीचं अनैसर्गिक गठबंधन केल्याचं मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.

  मुख्यमंत्र्यांच्या मनात काय, मला कसं कळणार – अजित पवार

  तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे आपण कसं सांगू शकणार, असा प्रतिप्श्न पत्राकारांना केला आहे. सरकार चालविण्याबाबत, निर्णयांबाबत आणि अडचणींबाबत त्यांच्याशी चर्चा होते, असंही त्यांनी म्हटलय.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावी सहकाऱ्याच्या वक्तव्यानं राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीला इशारा देण्यासाठी हे वक्तव्य केल्याचंही मानण्यात येतं आहे. आता नेमेकं येणाऱ्या काही तासांत राज्यात काही राजकीय भूकंप होतो का, चंद्र्कांत पाटील म्हणतात, तसं काही घडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.