नागपूरात वाहन पार्किंगच्या वादातून महिलेची हत्या

नागपूर - राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. दरदिवशी हजारो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. कोरोनाच्या महामारीतही राज्यात गुन्हेगारी आणि

 नागपूर – राज्यात कोरोनाने थैमान घातला आहे. दरदिवशी हजारो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई केली आहे. कोरोनाच्या महामारीतही राज्यात गुन्हेगारी आणि हत्येच्या घटनेत खंड पडलेला नाही आहे. नागपूरात एक भयानक घटना समोर आली आहे. चारचाकी वाहन पार्क करण्याच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली आहे. नागपूरातील नंदनवन पोलीस स्थानकाच्या परिसरात हि घटना घडली आहे. 

नेमके काय आहे प्रकरण 

मयत महिलेचे नाव आरती गिरडकर आसे आहे. ही महिला नंदनवन परिसरात राहते. आरोपी आणि त्यांच्यात वाहन पार्किंगच्या कारणावरुन वाद झाले. नेहमी भांडण होत असत. आरोपीचे नाव एकनाथ टपरे आहे. रात्रीच्या वेळी आरोपी वाहन पार्कींग करण्यास गेला तेव्हा मयत आरती आणि एकनाथ यांच्यात वाद झाला हा वाद एवढा वाढला की त्यामध्ये आरोपीने महिलेची हत्या केली. स्थानिकांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला. 

स्थानिकांनी पोलीसांना कळवताच ते घटनास्थळी पोहचले. पोलीसांनी घटनास्थळावरुन महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनास पाठवला. आरोपीला अटक करण्यात आली. पोलीस अधिक तपास करत आहे. या घटनेमुळे नागरिंकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.