yashomati thakur

उत्तर प्रदेशातील हाथरस अत्याचार(hathras gang rape) प्रकरणाने देश ढवळून निघालेला असताना, भाजपाचे आमदार सुरेंद्रसिंह(surendra singh) यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे. मुलींवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठतेय. राज्याच्या महिला बालविकासमंत्री यशोमती ठाकूर(yashomati thakur) यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही संस्कारित आहोत म्हणून तुमची थोबाडं फोडली नाहीत’, असे जोरदार टीकास्त्र ठाकूर यांनी सोडले आहे.

मुंबई: उत्तर प्रदेशातील हाथरस अत्याचार(hathras gang rape) प्रकरणाने देश ढवळून निघालेला असताना, भाजपाचे आमदार सुरेंद्रसिंह(surendra singh) यांनी केलेल्या विधानाने खळबळ उडाली आहे. मुलींवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे, असे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठतेय. राज्याच्या महिला बालविकासमंत्री यशोमती ठाकूर(yashomati thakur) यांनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही संस्कारित आहोत म्हणून तुमची थोबाडं फोडली नाहीत’, असे जोरदार टीकास्त्र ठाकूर यांनी सोडले आहे.

हाथरस प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी देशभरातून होते आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे आमदार सुरेद्रसिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘देशातील बलात्काराचे गुन्हे शिक्षा किंवा तलवारीने नव्हे, तर चांगल्या संस्काराने रोखता येतील. त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या मुलींवर चांगले संस्कार करावेत. त्यांना शालिनतेची शिकवण द्यावी’ अशी प्रतिक्रिया सुरेंद्र सिंह यांनी दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर सडकून टीका करण्यात येते आहे.

महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनीही सुरेंद्र सिंह यांच्या भूमिकेचा निषेध केला आहे. ‘भाजपाने पहिल्यांदा आपल्या नेत्यांना संस्कार शिकवावेत. या नेत्यांची अनेक प्रकरणे समोर येतात, कुणाची सीडी बाहेर येते, तर कुणाचे काय येते. महिलांनी कसे राहावे हे त्यांनी आम्हाला अजिबात शिकवू नये. आमच्यावर संस्कार आहेत म्हणून आम्ही सावित्री झालो, रमाबाई झालो, त्यामुळेच देशाच्या सर्वोच्चपदी इंदिराजी विराजमान होऊ शकल्या. आमच्यावर संस्कार आहेत, म्हणून अजूपर्यंत तुमचं थोबाड आम्ही फोडलेले नाही. आमच्या संयमाला आमची दुर्बलता समजू नका. कुठलीही महिला ही दुर्बल नसते, वेळ आली की ती दुर्गेचं रुप धारण करते. त्यामुळे खऱ्या संस्कारांची शिकवण महिलांसोबोत पुरुषांना देखील देण्याची गरज आहे. महिलांचा मानसन्मान करण्याची शिकवण घरापासूनच सुरु होते. आणि ती आपण सुरु केली पाहिजे. भाजपाच्या वायफळ आणि वाचाळ नेत्यांना जनता मतदानाच्या दिवशी उत्तर देईल.’