केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेसची मूक निदर्शने

 कोल्हापूर: पंतप्रधान नेरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीच्या काळात २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली. सहा महिने झाले या पॅकेज एक दमडीही मिळाली नाही, नेमकं या पॅकेजचं मोदी सरकारनं काय केलं? असा सवाल करत जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर व धनंजय महाडीक यांच्या कार्यालयासमोर मूक आंदोलन केले. यापुढेही वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करून आम्ही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना जाब विचारणार असल्याचा इशाराही यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

कोरोना महामारीच्या काळात देशभरातील उद्योगधंदे बंद पडले. शेकडो तरुणांचा रोजगार गेला, जनता वैफल्यग्रस्त बनली. रोजी – रोटीचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत जनतेकडून केंद्राकडे मदतीची मागणी होवू लागली. जनतेचा वाढता रोष लक्षा घेवून मोदी सरकारने आत्मनिर्भर या गोंडस नावाखाली स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केले. पाच महिने झाले अद्याप मोदी सरकारचं पॅकेजमधील एक दमडी सुध्दा जनतेच्या हाती पडलेली नाही.

मोदी सरकारनं घोषणा केलेल्या या २० लाख कोटी रुपयाचं पॅकेज नेमकं कुठं गेलयं.असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडला आहे. मोदी सरकारचं हे पॅकेज नेमकं जनतेपर्यंत पोहोचल की नाही याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माहिती घेतली. मात्र हे पॅकेज सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचले नसल्याच दिसून आले आहे. एवढा मोठा निधी नेमका गेला कुठे,. निधी कधी मिळणार यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निवास्थानासमोर, कार्यालयासमोर २० लाख कोटी गेले कुठे असे फलक झळकावत मुक आंदोलने केली. कोल्हापुरातही इंद्रजित साळोखे, कल्याणी माणगावे, ऋषीकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानासमोर मूक आंदोलन केले. मोदी सरकारचे २० लाख कोटी गेले कुठे असे फलक झळकावत भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांना युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जाब विचारला आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांनी निदर्शनास सामोरे जाऊन आंदोलनकर्त्यांच्या भावना समजावून घेण्यापेक्षा घरी देवघरात पूजा करण्यात धन्यता मानली. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्याकडून मोदी सरकाच्या २० लाख कोटी रुपयांच काय केले ? याचे उत्तर कार्यकर्त्यांना अपेक्षित होते. मात्र याच उत्तर कार्यकर्त्यांना मिळाल नसल्यानं इथून पुढे भाजपाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला आम्ही हा जाब विचारुन आमची मागणी केंद्र सरकारकडे पोहोचवणार असल्याचं युवक काँग्रेसच्या कल्याणी माणगावे यांनी सांगितले. या मूक आंदोलनात जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, उपाध्यक्ष बयाजी शेळके दिपक थोरात, उदय पोवार, विनायक पाटील, योगेश कांबळे, लखन भोगम, संजय सरदेसाई, संभाजी पाटील, आनंदा करपे, सनी सावंत, अनिल कांबळे सहभागी झाले होते. दरम्यान माजी खासदार आणि सध्या भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य असलेले धनंजय महाडिक यांच्या कावळा नाका येथील कार्यालयासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर भारत पॅकेजचा फलक उभारला होता. मोदींचे हे पॅकेज कुठे आहे असा आक्षेप कार्यकर्त्यांनी नोंदवल्यानं  भाजपा कार्यकर्त्यांनी उभारलेला मोदीचा आत्मनिर्भर भारत पॅकेजचा हा फलक आंदोलकांच्या हातातून पोलिसांनी काढून घेतले व आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले.