teacher

शासकीय शाळांमध्ये(government schools) विद्यार्थ्यांच्या कमी उपस्थितीनंतर आता शिक्षकांची अनुपस्थिती शिक्षण विभागासाठी(education department) अडचणीची ठरू पाहात आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील ४० तर, संपूर्ण राज्यातील सुमारे १६,००० शिक्षक(teachers not present in school) शाळेतून बेपत्ता असल्याचे उघडकीस आले आहे.

जबलपूर: शासकीय शाळांमध्ये(government schools) विद्यार्थ्यांच्या कमी उपस्थितीनंतर आता शिक्षकांची अनुपस्थिती शिक्षण विभागासाठी(education department) अडचणीची ठरू पाहात आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील ४० तर, संपूर्ण राज्यातील सुमारे १६,००० शिक्षक(teachers not present in school) शाळेतून बेपत्ता असल्याचे उघडकीस आले आहे.

सार्वजनिक शिक्षण संचालनालयाने विभागीय सहसंचालक आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठवून शिक्षण विभागाच्या कागदपत्रात मोठ्या प्रमाणात शिक्षक कार्यरत असल्याची नोंद असताना, ते कुठे आहेत?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आकडेवारीवर नजर टाकल्यास २०१८-१९ मध्ये तीन लाख २०,४४० शिक्षक कार्यरत होते. यानंतर २०१९-२० मध्ये जेव्हा जिल्ह्यांतून शिक्षकांच्या उपस्थितीबाबतची माहिती आली, तेव्हा त्या अहवालात शिक्षकांची संख्या ३,०४,२२५ एवढीच दाखविण्यात आली. यामुळे सार्वजनिक शिक्षण संचालनालयाने या प्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना पुन्हा शिक्षकांची संख्या मोजावी, असे आदेश दिले आहेत.

कारवाई होणार

संचालनालयाने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांना, जे शिक्षक शाळेत न येता दुसरी कामे करीत आहे, त्यांच्यावर कारवाई करावी, असे बजावले आहे. तूर्त विभागाकडून आलेल्या आकडेवारीत सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शिक्षकांच्या संख्येची संगणकात एंट्री करताना काही गडबड झाली असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे अधिकारी माहिती अपडेट करीत आहे.