महाराष्ट्र कोरोनाच्या विळख्यात ? कोरोनाबाधितांच्या आकड्यासह मृतांच्या संख्येचाही चढता आलेख -इतक्या जणांचा झाला मृत्यू

मागील काही दिवसांपासून(corona patients in maharashtra) काेराेना मृत्यूसंख्येतही(corona death in maharashtra) वाढ हाेत असल्याचे समाेर येत आहे. आज राज्यात ९२ काेराेना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

    मुंबई: शनिवारी राज्यात २७,१२६ नवीन कोरोना रुग्णांची( corona patients in maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २४,४९१४७ झाली आहे. मागील काही दिवसांपासून काेराेना मृत्यूसंख्येतही वाढ हाेत असल्याचे समाेर येत आहे. आज राज्यात ९२ काेराेना बाधितांचा मृत्यू झाला आहे. आज १३,५८८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २२,०३,५५३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ % एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण १,९१,००६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    दरम्यान राज्यात आज ९२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण ९२ मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १० मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १० मृत्यू पालघर-५, नागपूर-३, नाशिक-१ व चंद्रपूर-१ असे आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत २९८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
    दरम्यान मुंबईत दिवसभरात २९८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ३५८८९६ एवढी झाली आहे. तर आज ७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आतापर्यंत ११५७६ मृत्यूची नोंद करण्यात आली.