antibodies can not give you an confirm assurance to avoid reinfection of corona says expert nrvb

मंगळवारी राज्यात २७,९१८ नवीन रुग्णांची(corona patients in maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७,७३,४३६ झाली आहे.

    मुंबई : मंगळवारी राज्यात २७,९१८ नवीन रुग्णांची(corona patients in maharashtra) नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २७,७३,४३६ झाली आहे. आज २३,८२० रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यात आजपर्यंत एकूण २३,७७,१२७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.७१% एवढे झाले आहे. राज्यात आज एकूण ३,४०,५४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

    राज्यात आज १३९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. आज नोंद झालेल्या एकूण १३९ मृत्यूपैकी ७२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४५ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू धुळे-७, जळगाव–३, ठाणे-३, पुणे-३, साेलापूर-२, वाशिम-१, अहमदनगर-१, बीड-१ आणि बुलढाणा-१ असे आहेत.

    आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९६,,२५,०६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २७,७३,४३६ (१४.१३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १६,५६,६९७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १७,६४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

    मुंबईत दिवसभरात ४७६० नवे रुग्ण
    दरम्यान मुंबईत दिवसभरात ४७६० नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या ४०९३७४ एवढी झाली आहे. तर आज १० कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आले. आता पर्यंत ११६७५ मृत्यूची नोंद करण्यात आली.