corona

पनवेल : रायगड जिल्ह्यात आज ३९१ नवीन कोरोना रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३६३ रुग्ण बरे झाल्याने घरी गेले आहेत. रायगड जिल्ह्यात  कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १५५९२  झाली असून जिल्ह्यात ४३० जणांचा मृत्यू झाला आहे. 

रायगड जिल्ह्यात आज कोरोनाचे ३९१ नवीन रुग्ण सापडले असून ३६३ जणांनी कोरोनावर मात केली आहे . पनवेल तालुक्यात १८०  नवीन रुग्ण आढळले असून पनवेल महापालिका क्षेत्रात १४३ नवीन रुग्ण आढळले आहेत. आज पनवेल महापालिका क्षेत्रात २ पनवेल ग्रामीण २ , महाड , अलिबाग , श्रीवर्धन आणि कर्जत  येथील व्यक्तींचा  मृत्यू झाला आहे .

पनवेल ग्रामीणमध्ये ३७ , खालापूर ३८ , महाड ३७, रोहा २७ , अलिबाग २४ , पेण २२ , उरण १८ , पोलादापूर ११ , कर्जत ९ ,माणगाव ९,  मुरुड ९ ,  सुधागड ३ ,श्रीवर्धन  आणि म्हसळ्यामध्ये २  रुग्ण आढळले आहेत. रायगड जिल्ह्यात ५०३८२  टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी १५५९२ पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच २७४ टेस्टचे रिपोर्ट अद्याप बाकी आहेत. कोरोनावर ११९५७  जणांनी मात केली असून ३२०५  रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात ४३०  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.