कल्याण डोंबिवलीमध्ये ४२४ नवे कोरोना रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ४२४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून ३७१ जणांना गेल्या २४ तासांत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ४२४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २५,९८४ झाली आहे. यामध्ये ३१६८ रुग्ण उपचार घेत असून २२,२७८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ५३८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ४२४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ७८, कल्याण पश्चिम- ११२, डोंबिवली पूर्व- १४३, डोंबिवली पश्चिम- ७५, मांडा टिटवाळा- १३, तर मोहना येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९२ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १३ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ३ रुग्ण होलीक्रॉस रुग्णालयातून, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून, ९ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.