अकरावीच्या विशेष फेरीत ५९ हजार विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश ,इतक्या जागा रिक्त

करावीच्या विशेष फेरीची(eleventh standard special entrance round) गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या ६८ हजार १७८ विद्यार्थ्यांपैकी ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे.

मुंबई: अकरावीच्या विशेष फेरीची(eleventh standard special entrance round) गुणवत्ता यादी सोमवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. यामध्ये अर्ज केलेल्या ६८ हजार १७८ विद्यार्थ्यांपैकी ५९ हजार ३२२ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट मिळाली आहे. तर सुमारे ८ हजार ८५६ विद्यार्थीना प्रवेश मिळाला नाहीये, या यादीनंतर मुंबई विभागात किमान ८९ हजार ४४ जागा रिक्त राहतील,असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

विशेष फेरीमध्ये मुंबई विभागातील कॉलेजांमध्ये सर्व शाखांच्या मिळून १,४८,३८६ जागा (कोटा वगळून) तिसऱ्या फेरीसाठी उपलब्ध होत्या. यासाठी एकूण ६८,१७८ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते, यापैकी ५९,३२२ विद्यार्थ्यांना विशेष फेरीत कॉलेज अलॉट करण्यात आले आहेत. यामध्ये वाणिज्य शाखेचे ३५ हजार ४२३, कला शाखेचे ४ हजार ४८७, विज्ञान शाखेचे १८ हजार ८१९ तर एचएसव्हीसी शाखेच्या ५९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या विशेष फेरीमध्ये निवड झालेले विद्यार्थी महाविद्यालयांत ३१ डिसेंबर सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत. त्यानंतर प्रवेशाची पुढील कार्यपद्धती शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात येणार आहे. या यादीसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण ३५ हजार ३१४ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महािवद्यालय अलॉट झाले आहे.

तिसऱ्या फेरीनंतर एक लाख ३५ हजार ४६६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. या यादीत कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांना आता ज्युनिअर कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाणार असल्याचे बाेलले जात आहे. विशेष फेरीमध्ये जागा अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य मंडळाचे तब्बल ५४ हजार ४७८ विद्यार्थी आहेत. सीबीएसई ,मंडळाचे १ हजार ७८३ तर आयसीएसई मंडळाचे २१५४ विद्यार्थी आहेत.

विशेष फेरीनंतर यादीचे मुंबईतील शाखानिहाय अलॉट प्रवेश
कला – ४,४८७
वाणिज्य – ३५,४२३
विज्ञान – १८,८१९
एमसीव्हीसी – ५९३
एकूण – ५९,३२२