ॲड.रत्नाकर आलम यांचे हृदयविकाराने निधन

मुरबाड तालुक्यातील सुप्रसिद्ध वकील आणि डॉक्टर रत्नाकर आलम (वय४१ वर्ष) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

मुरबाड : तालुक्यातील सुप्रसिद्ध वकील आणि डॉक्टर रत्नाकर आलम (वय ४१ वर्ष)  यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
मनमिळावू, सरळसाध्या आणि गोरगरीब सर्वसामान्यांना निस्वार्थी मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी अनेकांच्या मनात घर केले होते. नुकतेच त्यांनी वकिलीची सनद मिळवून आयुष्यातील एका नव्या पर्वाला सुरुवात केली होती. अनेक पत्रकार आणि सामाजिक संघटनांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळे अनेक संस्था, न्यूज पोर्टल, तसेच पत्रकार संघटनांचे ते कायदेशीर सल्लागार होते. त्यांच्या निधनाने मुरबाड तालुक्यात शोक व्यक्त होत असून एक उमदा निस्वार्थी आणि होतकरू कार्यकर्ता गमावल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.