भाजपनंतर राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध, मुख्यमंत्र्यांकडे मांडली भूमिका

राज्यात कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन(rashrawadi`s view about lockdown) जाहीर करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध दर्शवला आहे.

    मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची(corona patients in maharashtra) संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन(rashrawadi`s view about lockdown) जाहीर करण्यात आला आहे. मात्र राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध दर्शवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राष्ट्रवादीने लॉकडाऊनला असलेला विरोध दर्शविला आहे. याआधी भाजपनेही लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता.आता राष्ट्रवादीनेही विरोध दर्शववल्याने मुख्यमंत्र्यांची कोंडी झाली आहे.

    राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार होत आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं.

    त्यांनी पुढे सांगितलं की, लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही. जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे  हा पर्याय योग्य होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवायला हव्यात. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही.

    अहमदाबादमध्ये कुठेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट झाली नाही. ही अफवा आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

    राज्यात सत्ता स्थापन करत असताना आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत गेलो. पण आम्ही भाजपबरोबर गेलो नाही. आता आघाडीतील एक पक्ष असलेला राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाईल असा संभ्रम निर्माण केला जात आहे. पण तसे काही नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.