राहुल गांधी भेटीनंतर संजय राऊत म्हणतायत ‘काँग्रेसशिवाय आघाडी होऊ शकत नाही’

राऊत म्हणाले की, ‘राहुल गांधींशी दीर्घकाळ झालेली चर्चा ही राजकीय चर्चा आहे. सर्वकाही ठीक आहे. झालेल्या चर्चेबद्दल सर्वप्रथम मी उद्धवजींना सांगेन. विरोधकांच्या ऐक्याबाबत चर्चा झाली. विरोधकांची आघाडी झाली तर काँग्रेसशिवाय ती शक्य नाही, हे आम्ही याआधीही सांगितले आहे. त्याचबाबत चर्चा झाली आहे. राहुल गांधी लवकरच मुंबईत येत असून त्यानंतर पुढील कार्यक्रम ठरवला जाइल. 'मी राहुलजींना सांगितले आहे की तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही त्याठी पुढं येऊन काम केलं पाहिजे. जर कुणी अशाप्रकारे वेगळा फ्रंट निर्माण करेल, तर काँग्रेसच्या नेतृत्वात दुसरा फ्रंट तर काम करेलच ना. त्यांच्यासोबत आजही अनेक राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आहेत. मग विरोधकांचे तीन-तीन फ्रंट काय करतील?”

  शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी संध्याकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यूपीएच्या अस्तित्वावर निर्माण झालेल्या प्रश्नांबद्दल सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले की, ‘विरोधकांची एकच आघाडी असावी. काँग्रेसशिवाय भाजप विरोधातील पक्षांची आघाडी होऊ शकत नाही, असे शिवसेनेने याआधी म्हटले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेली त्रिपक्षीय आघाडीही मिनी यूपीएसारखीच आहे.’ असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

  पुढं बोलताना राऊत म्हणाले की, ‘राहुल गांधींशी दीर्घकाळ झालेली चर्चा ही राजकीय चर्चा आहे. सर्वकाही ठीक आहे. झालेल्या चर्चेबद्दल सर्वप्रथम मी उद्धवजींना सांगेन. विरोधकांच्या ऐक्याबाबत चर्चा झाली. विरोधकांची आघाडी झाली तर काँग्रेसशिवाय ती शक्य नाही, हे आम्ही याआधीही सांगितले आहे. त्याचबाबत चर्चा झाली आहे. राहुल गांधी लवकरच मुंबईत येत असून त्यानंतर पुढील कार्यक्रम ठरवला जाइल.’

  राहुल गांधींनी नेतृत्व करावे

  राऊत पुढे म्हणाले, ‘मी राहुलजींना सांगितले आहे की तुम्ही नेतृत्व करा, तुम्ही त्याठी पुढं येऊन काम केलं पाहिजे. जर कुणी अशाप्रकारे वेगळा फ्रंट निर्माण करेल, तर काँग्रेसच्या नेतृत्वात दुसरा फ्रंट तर काम करेलच ना. त्यांच्यासोबत आजही अनेक राजकीय पक्ष, प्रादेशिक पक्ष आहेत. मग विरोधकांचे तीन-तीन फ्रंट काय करतील?”

  विरोधकांची एकच आघाडी असावी

  राऊत पुढे म्हणाले, “मी इतकंच सांगतो की, विरोधकांची एकच आघाडी असावी. तुम्ही एकत्र बसून नेतृत्वाबाबत चर्चा करू शकता. पण एकच आघाडी असेल आणि एकच आघाडी असावी.

  काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील मतभेद दूर करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे का? असा प्रश्न विचारला असता यावर राऊत म्हणाले, “यासाठी शरद पवार पुरेसे आहेत, मजबूत आहेत, मोठे नेते आहेत.” याचबरोबर, “राहुल गांधी जेव्हा मुंबईत येतील तेव्हा जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामकाज सुरू केलेलं असेल, तर नक्कीच या दोघांची भेट होईल. प्रियंका गांधी यांची मी उद्या भेट घेणार आहे.” अशी देखील यावेळी संजय राऊत यांनी माहिती दिली.