बँकांनी नागरिकांना आत्मनिर्भर योजनेचा लाभ करून द्यावा – डॉ. आशिया

भिवंडी: प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजनेचा लाभ सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी(nationalized banks) लाभ धारकांना उपलब्ध करण्यासाठी सहकार्य करून दहा हजार रुपये कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यासाठी किरकोळ फेरीवाल्यांना सहकार्य करावे असे आवाहन भिवंडी पालिका आयुक्त डॉ.पंकज आशिया यांनी बँक व्यवस्थापक यांच्या बैठकीत  केले.पंतप्रधान स्वनिधी योजना यशस्वपणे राबवण्यासाठी राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँका आदींच्या व्यवस्थापकांची बैठक गुरुवारी पालिका सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी पालिका आयुक्त डॉ. आशिया यांनी आवाहन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, मुख्यालय उपायुक्त डॉ.दीपक सावंत,नूतन खाडे व शहरातील सर्व राष्ट्रीय बँक यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी सर्व बँक व्यवस्थापक यांना आवाहन केले की, लॉकडाऊनच्या काळात किरकोळ फेरीवाले विक्रेते यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. अशा किरकोळ फेरीवाले विक्रेत्यांना तातडीने आर्थिक मदत करून त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे त्याकरिता पंतप्रधान स्व:निधी योजना केंद्र सरकारने लागू केली आहे.या योजनेअंतर्गत किरकोळ फेरीवाले विक्रेते यांना रक्कम रुपये १० हजार कर्ज स्वरूपात उपलब्ध केले जाणार आहेत. या योजनेत किरकोळ फेरीवाले यांनी ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे.सदर अर्ज आपल्या नजीकच्या बॅंकेतून राष्ट्रीयकृत किंवा  सहकारी बॅंकेत सादर केल्यानंतर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.किरकोळ फेरीवाले यांनी ऑनलाईन अर्ज करावेत. याकामी काही अडचणी असल्यास पालिकेच्या मार्केट विभाग प्रमुख किंवा मुख्यालयातील राष्ट्रीय नागरी रोजगार अभियान  येथे संपर्क साधावा. या योजनेत आजपर्यंत ऑनलाईन १,३३४ फेरीवाल्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच ५०४ फेरीवाले यांना महानगरपालिकेतर्फे प्राधिकृत पत्र देण्यात आले आहे व त्यांचे अर्ज बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत.ही योजना राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँका यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे. तरी बँकांनी पंतप्रधान स्व :निधी आत्मनिर्भर योजना सुरळीपणे राबवण्याकामी सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी सर्व बँक व्यवस्थापकांना केले आहे.