शैलेश तिवारी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार – जगन्नाथ शिंदे

कल्याण : सध्याच्या बिकट परिस्थितीत कोविड रुग्णांना रेमडिसिव्हर आणि ऍक्टिमारा ही इंजेक्शन नवसंजीवनी ठरत आहे. ऍक्टिमारा इंजेक्शनचा तुटवडा(injection shortage) असल्याचा फायदा घेत जनमानसात संभ्रम निर्माण करून माझ्यावर बेछूट आरोप करून प्रतिमा मलिन कटण्याचा प्रयत्न करणाऱ्या शैलेश तिवारी(shailesh tiwari) यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असून त्यांच्याविरुद्ध सायबर क्राईम(crime) तसेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असल्याची माहिती जगन्नाथ शिंदे यांनी दिली. तसेच चुकीचे मेसेज फॉरवर्ड करणाऱ्यांचीदेखील चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

लक्ष्मी डिस्ट्रीब्युटर हे राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे(jagannath shinde) यांचे असून त्यांचेच अमेय फार्मसीदेखील आहे. त्यांनी आपसात साटेलोटे करून, इंजेक्शनचा काळाबाजार(injection black market) करत असल्याचा आरोप जाणीवपूर्वक राष्ट्रीय कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी केला होता. तिवारी यांच्या या आरोपानंतर जगन्नाथ शिंदे यांनी त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

कोरोना संसर्गामुळे गंभीर रुग्णांना टोसीलीझुमॅप इंजेक्शन नवसंजीवनी ठरत असल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्याच दरम्यान कंपनीकडून जवळपास आठ दिवस इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने रुग्णाची धावपळ उडाली होती. केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी परिस्थितीची जाण लक्षात घेऊन गरजूंना ४०५६५ चे इंजेक्शन ३१५०० ला उपलब्ध करून देत होते. आपल्या माध्यमातून रुग्णांना होत असलेली मदत सहन न झाल्याने शैलेश तिवारी यांनी काळाबाजारी केल्याचा चुकीचे आरोप लावून सोशल मीडियावर जाणीवपूर्वक बदनामी केली असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

इमर्जन्सीच्या कालखंडात वातावरण दूषित करून लक्ष्मी डिस्ट्रीब्युटर(laxmi distributor) आणि अमेय फार्मसीच्या माध्यमातून काळाबाजार होत असल्याचा करून सर्वसामान्य नागरिकांना देखील वेठीस धरण्याचे काम तिवारी यांनी केले आहे. लक्ष्मी एजन्सी आणि अमेय फार्मसी यांची अन्न व औषध प्रशासनाकडून नुकतीच कसून चौकशी करण्यात आली. यामध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळून आलेली नाही. इंजेक्शन नेलेल्या रुग्णांचीदेखील दूरध्वनीद्वारे चौकशी करण्यात आली त्यातूनदेखील झालेले आरोप हे चुकीचे असल्याचे सिद्ध झाले.

त्यामुळे तक्रारदार शैलेश तिवारी याच्या विरुध्द सायबर क्राईम, ठाणे कोळसेवाडी पोलीस स्टेशन व महात्मा फुले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, कल्याण न्यायालयात त्याच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचे जगन्नाथ शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाकडून लगेच कशी काय क्लीनचीट देण्यात आली, सरकारच्या दबावाखाली हे काम करण्यात आलं असून आपण फिर्यादी असतांना याचा तपास करताना आपल्याला देखील बोलवणं गरजेचं होतं. न्यायालयामार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रीय कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांनी सांगितले.