Amit Shah

नवी दिल्ली : कोरोना व्हायरस(corona virus) संक्रमणातून बरे झाल्यानंतर पुढील उपचारांसाठी १८ ऑगस्टला एम्स रुग्णालयात (AIIMS Hospital) उपचारांसाठी दाखल झालेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांना आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे असं रुग्णालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. शहा उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून त्यांना रुग्णालयातून लवकरच सुट्टी देण्यात येईल असं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) ने शनिवारी एका वृत्तात म्हटलं होतं.

शहा (५५) यांनी कोविड-१९ (covid-19) चाचणीत संक्रमण झाल्याची माहिती २ ऑगस्टला दिली होती. त्यांच्यावर मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना तेथून सुट्टी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी थकवा आणि अंगदुखीची तक्रार केल्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.