डोंबिवलीतील चेरा नगर विभागाला ६ वर्षांनी मिळाले हक्काचे पाणी

डोंबिवली : कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील सांगावमधील चेरा नगर परिसरातील काही नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते. विधानसभा निवडणुकीआधी मनसे आमदार राजू पाटील यांनी राहिवाश्यांना शब्द दिला होता.  निवडणुकीनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलेला शब्द पाळला असून नागरिकांना हक्काचे पाणी मिळाले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या सांगाव परिसरातील चेरा नगरमध्ये राहिवाश्यांना पाण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. राजकीय नेत्यांच्या कुरघोड्यांमुळे येथील रहिवाश्यांना पाण्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र विधानसभा निवडणुकी दरम्यान कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील मनसेचे उमेदवार तथा आमदार राजू पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी येथील रहिवाश्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याचा शब्द मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला होता. आज शुक्रवारी पाटील यांनी चेरा नगर येथील नागरिकांना लॉकडाऊन मध्ये त्यांचे हक्काचे पाणी देऊन दिलेला शब्द पाळला आहे. सहा वर्षांनी येथील नागरिकांना हक्काचे पाणी मिळाल्याने येथील नागरिकांनी मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील, कल्याण ग्रामीण किकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील आणि मनसे पदाधिकाऱ्यांचे देखील आभार मानले आहे.