आयपीएस अमित लोढा
आयपीएस अमित लोढा

आयपीएस अमित लोढा यांनी त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात जहाल गुन्हेगारांशी करावा लागलेला संघर्ष शब्दांकित केला आहे. त्यापैकी त्यांनी सामंत प्रताप या गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्यांची कथा मन पिळवटून टाकणारी आहे. तो इतका निर्दयी होता की, त्याने अवघ्या 24 तासात 15 लोकांची हत्या केली होती. तो एका हातानी लहान मुलाचे डोके पकडायचा आणि दुसऱ्या हाताने चिमुकल्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडायचा. आयपीएस लोढा यांनी या कुख्यात गुन्हेगाराच्या गंभीर गुन्ह्यांचा पाढाच वाचला आहे.

दिल्ली (Delhi).  आयपीएस अमित लोढा यांनी त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात जहाल गुन्हेगारांशी करावा लागलेला संघर्ष शब्दांकित केला आहे. त्यापैकी त्यांनी सामंत प्रताप या गुन्हेगाराने केलेल्या गुन्ह्यांची कथा मन पिळवटून टाकणारी आहे. तो इतका निर्दयी होता की, त्याने अवघ्या 24 तासात 15 लोकांची हत्या केली होती. तो एका हातानी लहान मुलाचे डोके पकडायचा आणि दुसऱ्या हाताने चिमुकल्याच्या डोक्यात बंदुकीची गोळी झाडायचा. आयपीएस लोढा यांनी या कुख्यात गुन्हेगाराच्या गंभीर गुन्ह्यांचा पाढाच वाचला आहे.

वर्ष 2001 ची घटना! नवादा तुरुंगातून पाच पोलिसांची हत्या करून गुंड सामंतने पळ काढला. यानंतर त्याने विविध ठिकाणांवर प्रेस काॅन्फरन्स घेतल्या; पण तो प्रत्येेकवेळी पोलिसांच्या चमका देऊन पळ काढायचा. आयपीएस अमित लोढा यांच्या खांद्यावर सावंतला अटक करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्या काळात लोढा प्रचंड मानसिक तणावाखाली होते आणि सर्किट हाऊसमध्ये थांबले होते. लोढा यांची ती स्थिती पाहून त्यांच्या पत्नीने हत्या झालेल्या गावात तुम्ही गेले होते का? असा प्रश्न विचारला. यावर लोढा यांनी नकारात्मक उत्तर दिले; त्यामुळे पत्नी काहीशी संतापली आणि तिने लोढा यांच्यावर ते सेल्फिश असल्याचा आरोप केला. याचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. पुढे आयपीएस लोढा त्या गावात गुन्ह्याच्या तपासासाठी गेले असता गावात एकदम शांतता होती. एका मोठ्या घरात काही महिला घोळका करून बसल्या होत्या. त्यातील एक महिला म्हणाली, साहेब! कुख्यात सावंतने आमच्या संपूर्ण परिवाराची हत्या केली आहे. त्याने एका गरोदर महिलेलाही मारून टाकले तर पुरुषांचा गळा कापला. लोढा यानंतर घराकडे परतले. घटनेविषयी चिंतन केल्यानंतर लोढांना घटनेचे गांभीर्य समजले. याविषयी चिंतन करत असताना एक पोलिस अधिकारी त्यांच्याजवळ आला. तो म्हणाला, लोढा साहेब सर्वांत पहिल्यांना सामंतला पकडण्यात आले तेव्हा मी त्याच्या मोबाइलची तपासणी केली. या दरम्यान माझ्यासमोर एक धक्कादायक बाब आली. ती म्हणजे एका पोलिस अधिकाऱ्याने सावंतला फोन केला होता. यात त्याने सावंतला नवीन पोलिस निरीक्षकापासून सावध राहण्याचा आणि मोबाइल बंद करून ठेवण्याचा सल्ला दिला होता; यामुळे गुंड सामंतवर आताच कारवाई केली तर सामंत प्रताप अलर्ट होईल.

सामंतने पोलिसांना गुंगारा देण्यासाठी स्वतःसह त्याचा साथिदार हाॅर्लिक्स यालाही मोबाइल बंद करायला सांगितला; पण हाॅलिक्सचे त्याच्या वहिनीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. यामुळे तो वहिनीला तर कधी पत्नीला फोन करायला. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी सामंत आणि हाॅर्लिक्सचे मोबाईल नंबर ट्रेस करण्याचे ठरविले. एकदा हाॅलिक्स त्याच्या वहिनीशी आणि पत्नीशी बोलत होता. त्याला आपल्या मुलांना पोलिस निरीक्षक बनवायचे असल्याचे तो म्हणाला. मोबाईल सुरू होताच पोलिसांच्या टेक्निकल टीमने हाॅलिक्सचे फोनवरील संभााषण रेकाॅर्ड केले. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून हाॅर्लिसला अटक केली.