18+ मोफत लस; 27 कोटी नागरिकांचे आजवर लसीकरण

21जूनपासून 18 वर्षावरील वयोगटांवरील सर्वांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत गेल्या 7 जून रोजीच घोषणा केली होती. आता सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस मोफत मिळणार आहे.

    दिल्ली : 21जूनपासून 18 वर्षावरील वयोगटांवरील सर्वांचे मोफत लसीकरण केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत गेल्या 7 जून रोजीच घोषणा केली होती. आता सरकारी लसीकरण केंद्रावर ही लस मोफत मिळणार आहे.

    राज्याची लोकसंख्या, कोरोना रुग्ण आणि लसीकरणाचा वेग या आधारावर केंद्र सरकार राज्यांना लशीचा पुरवठा करणार आहे. यासोबतच लशींचा नाश झाल्यास पुरवठ्यात घट होऊ शकते असा इशाराही केंद्र सरकारने दिला आहे. त्यामुळे लशींचा नाश रोखण्यासाठी राज्य सरकारांना लसीकरण मोहिमेला वेग देणे आवश्यक ठरणार आहे.

    आजपासून नवे बदल

    • सरकारी लसीकरण केंद्रावर सर्वांना मोफत लस
    • केंद्र सरकार लस कंपन्यांकडून 75% डोस खरेदी रणार
    • लस खरेदीत राज्य सरकारची कोणतीच भूमिका राहणार नाही
    • खासगी रुग्णालये पूर्वीप्रमाणेच कंपन्यांकडून 25% डोस खरेदी करू शकतील.
    हे सुद्धा वाचा