बाईक रॅलीत सहभागी भाजप खासदाराला २१ हजार दंड

भाजपचे खासदार मनोज तिवारी यांसह भाजपचे अनेक खासदार हे लाल किल्ला ते नवीन दिल्लीमधील संसद भवनदरम्यान आयोजित केलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. याच रॅलीदरम्यान तिवारी यांनी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवली. त्यामुळे दंड ठोठावली आहे.

    नवी दिल्ली : भाजपचे खासदार मनोज तिवारी (BJP MP Manoj Tiwari) यांच्याविरोधात दिल्ली वाहतूक पोलिसांनी (Delhi Traffic Police) कारवाई केली. हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) मोहिमेसाठी तिवारी हे दिल्लीतील बाईक रॅलीमध्ये (Bike Rally) सहभागी झाले होते. यावेळी, त्यांनी दुचाकी चालवताना हेल्मेट (Helmet) घातले नव्हते. हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) झाल्यानंतर पोलिसांनी दंड ठोठावला. तिवारी यांना वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन (Violation Of Rules) केल्याप्रकरणी २१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला. त्याचप्रमाणे तिवारी हे ज्या व्यक्तीची दुचाकी चालवत होते त्या दुचाकी मालकालाही दंड ठोठावण्यात आला.

    तिवारींसहीत भाजपचे अनेक खासदार हे लाल किल्ला ते नवीन दिल्लीमधील संसद भवनदरम्यान आयोजित केलेल्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. याच रॅलीदरम्यान तिवारी यांनी हेल्मेटशिवाय दुचाकी चालवली.

    तिवारी यांनी ट्विटरवरुन आपण हा दंड भरणार असल्याचे सांगितले. आज मी हेल्मेट घातले नाही याबद्दल माफी मागतो. दिल्ली वाहतूक पोलिसांना मी सांगू इच्छितो की मी सर्व दंड भरणार आहे. या फोटोंमध्ये गाडीची नंबर प्लेट दिसत असून तो लाल किल्ल्याजवळ काढला आहे. कोणीही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवू नये अशी मी विनंती करतो. सुरक्षितपणे वाहन चालवा. तुमच्या कुटुंबियांना आणि मित्र परिवाराला तुमची गरज आहे, असे तिवारी यांनी ट्विट केले.