सोन्याच्या किंमतीत २८ टक्क्यांनी वाढ; गुंतवणुकीची उत्तम संधी

भारतात यावर्षी सोन्याचे दर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याच्या दरांमध्ये २०२१ सालीही वाढ होईल, असा अंदाज या श्रेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरवाढ होणार असली तरी गुंतवणुकदारांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे आकर्षण कायम असेल आणि सोने हेच भारतीयांसाठी गुंतवणुकीसाठी पहिली पसंती राहील असेही जाणकार सांगतात. जागतिक बाजारपेठेचा विचार करायचा झाल्यास २०२०मध्ये सोन्याचे दर २३ टक्क्यांनी वाढले आहेत.

  • नववर्षात सोने आणखी महागणार

दिल्ली (Delhi).  भारतात यावर्षी सोन्याचे दर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. सोन्याच्या दरांमध्ये २०२१ सालीही वाढ होईल, असा अंदाज या श्रेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दरवाढ होणार असली तरी गुंतवणुकदारांना सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे आकर्षण कायम असेल आणि सोने हेच भारतीयांसाठी गुंतवणुकीसाठी पहिली पसंती राहील असेही जाणकार सांगतात. जागतिक बाजारपेठेचा विचार करायचा झाल्यास २०२०मध्ये सोन्याचे दर २३ टक्क्यांनी वाढले आहेत.

महामारीमुळे दरवाढ
यावर्षी कोरोना महामारीमुळे बसलेला आर्थिक फटका, अर्थव्यवस्थांना झालेल्या नुकसानाचा भरपाई करण्यासाठी आणि वाढत्या महागाईमुळे यंदा सोन्याच्या दरांमध्येही वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक हा उत्तम मार्ग असल्याचे मानले जाते. २०२० हे सलग दुसरे असे वर्ष आहे जेव्हा सोन्याचे दर वाढलेत. यापूर्वी मागील वर्षी म्हणजेच २०१९ साली सोन्याच्या दरांमध्ये डबल दोन आकडी टक्केवारीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले.

मार्चपासून सोन्याच्या दरात वाढ
या वर्षी सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये सामान्य पद्धतीने वाढ दिसून आले. मात्र मार्च महिन्यामध्ये जागतिक स्तरावर करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर सोन्याचे दर भरमसाठ वाढले. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या भावाने उच्चांक गाठला. या वेळी एक तोळे सोने ५६ हजार २०० रुपयांपर्यंत गेले होते. जागतिक स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक देशांमधील अर्थव्यवस्थांसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आणि गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढल्याने त्याचे दरही वाढले. अनेक देशांमधील केंद्रीय बँकांनी लिक्विडीटीसंदर्भात महत्वाचे निर्णय घेतल्यानंतर गुंतवणुकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले आहे.

लसीच्या आगमनाने दरात घसरण
मात्र सोन्याला आलेली झळाळी ऑगस्ट महिन्यानंतर हळूहळू उतरु लागली. सोन्याच्या दरांमध्ये दहा टक्क्यांपर्यंत घसरण झाली. कोरोनाची लसीसंदर्भातील सकारात्मक बातम्या समोर येऊ लागल्यानंतर गुंतवणुकदारांनी सोन्याकडे पाठ फिरवली आणि दुसऱ्या श्रेत्रांमध्ये गुंतवणुकीचे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. सध्या बाजारामध्ये सोन्याची किंमत ५० हजार ३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे. बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारामध्ये सोन्याचा दर २५२ रुपयांनी गडगडला. दिल्लीतील सोन्याचा दर ५९ हजार ५०६ रुपयांपर्यंत खाली आला. बुधवारी चांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पहायला मिळाले. चांदीचा भाव ९३३ रुपये प्रति किलोने वाढून ६६ हजार ४९३ रुपयांपर्यंत वधारला.

२०२१ मध्ये काय होणार?
कमोडिटी मार्केटशी संबंधित जाणाकारांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २०२१ मध्येही गुंतवणुकारांची नजर सोन्यावर असणार आहे. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे जगभरातील अनेक केंद्रीय बँकांनी व्याजदर कमी केले आहेत. तसेच लिक्विडिटीसंदर्भातील नियमही शिथिल केले आहेत. आर्थिक विकास कायम रहावा या दृष्टीने हे बदल करण्यात आले असून गुंतवणुकदार याचा फायदा घेतील असे सांगण्यात येत आहे.