34 crore passengers, 33 lakh tonnes of freight Aviation boom - India ranks third in the world

याचप्रमाणे २०२७ पर्यंत विमानांची संख्याही वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या ७ वर्षांत भारतात १,१०० विमाने असतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वाधिक २५० विमाने इंडिगो कंपनीकडे आहे. कोरोना संकटापूर्वी, जानेवारी महिन्यात इंडिगो कंपनीकडून दररोज सुमारे १५०० विमान उड्डाणांचे संचालन केले जात होते. एका अंदाजानुसार, २०३८  पर्यंत भारताला जवळपास २४०० व्यावसायिक विमानांची गरज भासेल.

दिल्ली : कोरोना संकटापूर्वी भारताचे सिव्हिल एव्हिएशन अर्थात नागरी उड्डाण सेक्टर देशातील सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या उद्योगांमध्ये गणले जात होते. मात्र, कोरोना काळात जगातील इतर देशांप्रमाणेच भारताचा हवाई उद्योगही ठप्प झाला. सध्या भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमानचालन बाजार आहे.

२०२४  पर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हवाई उद्योगाच्या बाबतीत भारत ब्रिटेनला पछाडून तिसऱ्या क्रमांकावर पोहचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रवासी संख्येत वाढ

आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये भारतात ३४.१० कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला. गेल्या चार वर्षात विमान प्रवाशांमध्ये ११.१३ वाढ झाली आहे. याच कालावधीत देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या १२.९१टक्क्यांनी वाढली.

२०१९-२० या आर्थिक वर्षात एकूण २७.४५ कोटी प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. याच काळात भारतातून ६.६५ कोटी प्रवाशांनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवास केला.

विमानतळे वाढविण्याची योजना

मालवाहतुकीबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या चार वर्षांत विमानाद्वारे केल्या जाणाऱ्या मालवाहतुकीत ५.३२ टक्क्यांची दरवर्षी वाढ झाली आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षांत विमानाद्वारे केली जाणारी मालवाहतूक ३३ लाख टनावर पोहचली आहे.

केंद्र सरकार विमान प्रवासी संख्या वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मार्च २०१९ पर्यंत भारतात एकूण १०३ विमानतळे संचालित केली जात होती, ज्यांची संख्या आर्थिक वर्ष २०३९-४० पर्यंत २०० वर नेण्याची योजना आहे.

विमानांची संख्याही वाढणार