नवरा इमारतीमध्ये शिरताच तिने पाठवला तो प्रेमाचा शेवटचा मेसेज, पाचव्या मजल्यावरून मारली उडी

नेहा वर्माने पती धरम वर्मा गाडीतून इमारतीकडे येत असल्याचं बघितलं आणि छतावरून उडी(Woman Jumped From Terrace) मारली. यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

    दिल्लीत(Delhi) एक भयानक घटना घडली आहे. एका ५२ वर्षीय महिलेचा पाचव्या मजल्यावरून(52 Year Old Woman Died In Delhi) उडी मारल्याने मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या महिलेचं नाव नेहा वर्मा (Neha Warma) आहे. ही महिला मुखर्जी नगरमधील निरंकारी कॉलनीत राहत होती. दिल्ली पोलिसांनी(Delhi Police) दिलेल्या माहितीनुसार, पती इमारतीमध्ये येत असल्याचं बघितल्यावर महिलेने इमारतीवरुन उडी मारली.

    नेहा वर्माने पती धरम वर्मा गाडीतून इमारतीकडे येत असल्याचं बघितलं आणि छतावरून उडी मारली. यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. नेहा वर्मा पतीसोबत याच इमारतीत राहत होती. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असून दोघेही अमेरिकेत राहतात.

    मिळालेल्या माहितीनुसार, दांपत्याला घटस्फोट घ्यायचा होता. इमारतीवरुन उडी मारण्याआधी नेहा वर्माने पतीला “आय लव्ह यू”असा मेसेज पाठवला होता. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही आणि महिलेच्या मोबाईलची चाचपणी करत आहे. त्यांची मुलं दिल्लीत पोहोचल्यानंतर पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे.