अरे बापरे ! युरोपातून आलेल्या ६ जणांमध्ये आढळला कोरोनाचा नवा विषाणू

नवा कोरोना व्हायरस आढळून आल्यानंतर या सहा रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्या त्या राज्यातील सरकारांना याची सूचना देण्यात आली असून सर्व खबरदारीचे उपाय राबवले जात असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्यानं सांगितलंय. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिलीय.

इंग्लंडमधून भारतात आलेल्या ६ जणांच्या चाचणीत कोरोनाचा नवा स्ट्रेन असलेला विषाणू आढळून आलाय. या सहाजणांपैकी तिघांची चाचणी बंगळुरूमध्ये, दोघांची हैद्राबादमध्ये तर एकाची पुण्यातील प्रयोगशाळेत करण्यात आलीय.

नवा कोरोना व्हायरस आढळून आल्यानंतर या सहा रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलंय. त्या त्या राज्यातील सरकारांना याची सूचना देण्यात आली असून सर्व खबरदारीचे उपाय राबवले जात असल्याचं केंद्रीय आरोग्य खात्यानं सांगितलंय. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागानं दिलीय.

या रुग्णांसोबत प्रवास केलेले, त्यांच्या संपर्कात आलेले आणि त्यांच्या कुटंबातील व्यक्तींना शोधून त्यांच्यादेखील चाचण्या करण्यात आल्या आहेत. परिस्थितीवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेऊन असून आवश्यक सूचना वेळोवेळी राज्य सरकारपर्यंत पोहोचवल्या जात असल्याचं सांगण्यात येतंय.

आरोग्य खात्याच्या माहितीनुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत एकूण ३३ हजार प्रवासी युरोपातून भारतात आले आहेत. या सर्व प्रवाशांचा शोध घेतला जात असून त्यांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. यापैकी आतापर्यंत ११४ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत. २३ डिसेंबरपासून युरोपातून येणाऱ्या विमानांना तात्पुरती स्थगिती देण्यात आलीय. ३१ डिसेंबरपर्यंत ही स्थगिती आहे. त्यानंतर सरकारकडून ही मुदत वाढवली जाण्याची शक्यता आहे.