तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला ७ महिने पूर्ण ; राज भवनावर मोर्चाचे आयोजन

शेतकरी नेते युध्दवीर सिंग ८ ते १० लोकांसह दिल्लीतील उपराज्यपालांच्या घराजवळ पोहोचले. पोलिसांनी त्यांना राजभवनात जाऊ दिले नाही. त्यांना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी लेफ्टनंट गव्हर्नर दिल्लीच्या निवासस्थानाबाहेर तटबंदी केली आहे. जेणेकरून शेतकरी तिथे पोहोचू शकणार नाहीत.

    दिल्लीत तीन नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला आज ७ महीने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर देशभरातील शेतकरी आक्रमक झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने देशभरातील राज भवनावर मोर्चाचे आयोजन केले आहे.  किसान मोर्चाने या मोर्चाला शेती वाचवा, लोकशाही वाचवा असे नाव दिले आहे.

    शेतकरी नेते युध्दवीर सिंग ८ ते १० लोकांसह दिल्लीतील उपराज्यपालांच्या घराजवळ पोहोचले. पोलिसांनी त्यांना राजभवनात जाऊ दिले नाही. त्यांना ताब्यात घेतले. दिल्ली पोलिसांनी लेफ्टनंट गव्हर्नर दिल्लीच्या निवासस्थानाबाहेर तटबंदी केली आहे. जेणेकरून शेतकरी तिथे पोहोचू शकणार नाहीत.

    उपराज्यपालांच्या घराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय काटेरी तारांनी बॅरिकेडिंग करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर थांबविण्यासाठी ट्रक आणि डंपर रस्त्यावर उभे केले आहेत.

    दरम्यान, आम्ही दिल्ली एलजीच्या निवासस्थानी ट्रॅक्टर नेणार नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे. दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी शेतकरी नेत्यांना भेटण्यासाठी वेळ दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.