सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, आतापर्यंत ‘इतक्या’ रुपयांनी कमी झाले दर , जाणून घ्या

सोन्याचा दर प्रति तोळा 46,800 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या वायदे किंमतीतही (Silver Price Today) किरकोळ घसरण झाली आहे. जुलैच्या डिलिव्हरीच्या चांदीचे दर 19 रुपयांनी कमी होऊन 67,580.00 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाले आहेत.

    नवी दिल्ली: सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver) सातत्याने घसरण होत आहे. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (Multi Commodity Exchange MCX) व्यवहार बंद होत असताना देखील सोन्याचे दर कमी झाले होते. याठिकाणी ऑगस्टच्या सोन्याची वायदे किंमत (Gold Price Today) 158.00 रुपयांनी कमी झाली आहे.

    या घसरणीनंतर सोन्याचा दर प्रति तोळा 46,800 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या वायदे किंमतीतही (Silver Price Today) किरकोळ घसरण झाली आहे. जुलैच्या डिलिव्हरीच्या चांदीचे दर 19 रुपयांनी कमी होऊन 67,580.00 रुपये प्रति किलोच्या स्तरावर बंद झाले आहेत.

    शुक्रवारी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सोन्याच्या दरात घसरण झाली होती. अमेरिकेत सोन्याचा दर 12.47 डॉलरने घसरला आहे, यानंतर सोन्याचे दर 1,764.31 डॉलर प्रति औंस या स्तरावर बंद झाले आहेत.