डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी दोन लशींचे मिश्रण हा पर्याय होऊ शकतो – डॉ. रणदीप गुलेरिया

आपण लशींच्या मिश्रणाच्या पर्यायावर विचार करत आहोत, असे म्हटले होते. नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी म्हटले होते, की म्यूटेटेड व्हेरिएंटपासून सुरक्षितता आणि व्हॅक्सीन कव्हरेज वाढविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलू शकतो. यावरील परीक्षणाचे परिणाम काही महिन्यांतच येतील, अशी आशा आहे.

    नवी दिल्ली : कोरोनाचा अत्यंत संक्रमक डेल्टा आणि डेल्टा प्लस सारख्या व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी लशींचे मिश्रण एकपर्याय असू शकतो, असे मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मांडले आहे. मात्र हा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी आणखी माहितीचा साठा जमा आवश्यकता आहे. कोणते मिश्रण चांगले असेल, यावर आणखी संशोधनाची आवश्यकता आहे. पण हो, ही निश्चितपणे एक शक्यता आहे. लशींच्या मिश्रणावर इतर देशांतही प्रयोग सुरू आहेत. करणे आवश्यक मत त्यांनी व्यक्त केले आहे.
    मागील महिन्यात सरकारनेही, आपण लशींच्या मिश्रणाच्या पर्यायावर विचार करत आहोत, असे म्हटले होते. नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल यांनी म्हटले होते, की म्यूटेटेड व्हेरिएंटपासून सुरक्षितता आणि व्हॅक्सीन कव्हरेज वाढविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलू शकतो. यावरील परीक्षणाचे परिणाम काही महिन्यांतच येतील, अशी आशा आहे.
    डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कदाचित सिंगल डोस पुरेसा ठरणार नाही. संशोधनातही सांगण्यात आले आहे, की सिंगल डोस केवळ ३३ टक्केच संरक्षण देतो. जेव्हा दोन्ही डोस दिले जातात तेव्हा लोकांना ९० टक्के सुरक्षा मिळते. तसेच, डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कदाचित सिंगल डोस पुरेसा ठरणार नाही, ही आपल्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. अशात आपल्याला दुसरा डोस देण्याची आवश्यकता आहे. पण तो फार आधीच द्यावा लागेल. जेणे करून सर्वांची सुरक्षितता निश्चित करता येईल, असेही गुलेरिया म्हणाले.