आप-भाजपा नगरसेवकांमध्ये राडा

 दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी एकमेकांवर चपला, खुर्च्यांची फेकाफेकही केली.

दिल्ली. पूर्व दिल्लीतील नगरपालिका कार्यालयात आम आदमी पार्टी (आप) आणि भाजपाच्या नगरसेवकांनी चांगलाच गोंधळ घातला.  दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी एकमेकांवर चपला, खुर्च्यांची फेकाफेकही केली. नगरसेवक निधीत झालेला घोटाळा आणि केंद्रीय कृषी कायद्याविरोधातील आंदोलनादरम्यान हा प्रकार घडला. प्राप्त माहितीनुसार, सभागृहाचे कामकाज खंडित केल्या प्रकरणी नगरसेवकांवर कारवाई करण्यात आली आहे. याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून त्यात काही नगरसेवक हवेत चप्पल हलविताना दिसत आहेत. भाजपा नगरसेवकांनी तर केजरीवाल लाज बाळगा, नगर पालिकेला निधी द्या अशा घोषणाही दिल्या.

घोटाळ्याचा आरोप
‘आप’ नगरसेवकांनी भाजपा शासित उत्तर महानगरपालिकेत झालेल्या कथित 2500 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारावरून गोंधळ घातला. यावेळी ते पत्रके फडकावत कार्यालयात घोषणा देत होते. याप्रकरणी सीबीआय चौकशी झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली.

कर्मचाऱ्यांचे वेतनही थकित
नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांना पगार दिल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. ते म्हणाले की दिल्ली सरकार मनपा कर्मचाऱ्यांना वेतनच दे,त नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.  भाजपा नगरसेवकांनीही दिल्ली सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्याचवेळी दोन्ही गट आमने-सामने उभे ठाकले आणि हाणामारी सुरू झाली.