
महिलेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत पती शकील, दीर अकरम, सासू फातिमा, सासरे असरफ यांच्यासह आणखी काही नातेवाईकांनी कारची मागणी केल्याचं म्हटलं आहे. तसेच यासाठी आपल्या बेदम मारहाण करण्यात आली, छळ झाला आणि कायमचं माहेरी सोडल्याचं देखील म्हटलं आहे.
नवी दिल्ली: लग्नाच्या तब्बल १२ वर्षांनंतर २ लाख आणि कार न मिळाल्याने संतप्त झालेल्या पतीने पत्नीला ट्रिपल तलाख दिल्याची धक्कादायक घटना बुलंदशहरातील गुलावठी कोतवाली येथे घडली आहे. महिलेने पतीसह सासरच्या मंडळींनी देखील हुंड्यासाठी आपला खूप छळ केल्याचं म्हटंल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
मिळालेल्या माहितीनुसार,२००९मध्ये गुलिस्ता या महिलेचा मेरठच्या शकीलसोबत निकाह झाला होता. गुलिस्ताच्या कुटुंबाने निकाहाच्या वेळी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार हुंडा दिला होता. तसेच मोठ्या प्रमाणात खर्च देखील केला होता. पण निकाहानंतर सासरची मंडळी खूश नव्हती. ती आणखी हुंडा हवा म्हणून अडून बसली होती. ज्यावेळी गुलिस्ताने हुंडा आणण्यास नकार दिला तेव्हा तिचा मानसिक आणि शारीरीक छळ करण्यात आला. याच दरम्यान गुलिस्ताने दोन मुलांना जन्म दिला. मुलांच्या जन्मानंतरही गुलिस्ताचा पैशासाठी छळ सुरूच होता.
माहेरच्यांकडे दोन लाख रुपये आणि कारची मागणी करण्यात आली. महिलेने पोलिसांत केलेल्या तक्रारीत पती शकील, दीर अकरम, सासू फातिमा, सासरे असरफ यांच्यासह आणखी काही नातेवाईकांनी कारची मागणी केल्याचं म्हटलं आहे. तसेच यासाठी आपल्या बेदम मारहाण करण्यात आली, छळ झाला आणि कायमचं माहेरी सोडल्याचं देखील म्हटलं आहे. पतीने जाताना ट्रिपल तलाक दिला. अधिकाऱ्यांनी विवाहितेने दिलेल्या माहितीनुसार, पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच पोलीस देखील अधिक तपास करत असल्याची माहिती दिली आहे.