केंद्राच्या आक्षेपानंतर केजरीवालांचा घुमजाव, निनावी रेशन वितरण योजना राबवणार

लाभार्थ्यांच्या दारात रेशन वितरण(ration scheme) करण्याच्या आपच्या योजनेवर केंद्राने आक्षेप घेतला होता. या योजनेला कोणतेही नाव राहणार नाही आणि त्यांचे सरकार या योजनेचे कोणतेही श्रेय घेणार नाही, असे एका दिवसानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांनी सांगितले.

    दिल्ली: लाभार्थ्यांच्या दारात रेशन वितरण(ration scheme) करण्याच्या आपच्या योजनेवर केंद्राने आक्षेप घेतला होता. या योजनेला कोणतेही नाव राहणार नाही आणि त्यांचे सरकार या योजनेचे कोणतेही श्रेय घेणार नाही, असे एका दिवसानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(arvind kejriwal) यांनी सांगितले.

    केजरीवाल पुढे म्हणाले की, ते केंद्राच्या सर्व अटी मान्य करण्यास तयार आहेत पण कोणत्याही अडथळ्यांना परवानगी देणार नाहीत. केजरीवाल २५ मार्च रोजी ईशान्य दिल्लीच्या सीमापुरीतील १०० घरांना रेशनचे वितरण थेट त्यांच्या दारात ही योजना सुरू करणार होते.

    अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे की, केंद्राने आम्हाला पत्र लिहिले होते की आम्ही त्या योजनेची अंमलबजावणी करू शकत नाही. पत्रात असेही म्हटले आहे की, त्या योजनेला मुख्यामंत्री योजना म्हणता येणार नाही, मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना या योजनेचे नाव काढून टाकण्यास सांगितले. या योजनेला नाव असो वा नसो आम्ही फक्त लोकांच्या दारात रेशन वितरित करू.