दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग ऑन अफगाणिस्थान या मिटिंगचे आयोजन १० नोव्हेंबरला दिल्लीत करण्यात आले हे. भारातचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या मिटिंगच्या अध्यक्षस्थानी असतील. पाकिस्तानने यात सामील होण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. भारताने पाकिस्तानचा हा निर्णय दुर्भाग्यपूर्म असल्याचे म्हटले आहे. तसेच या निर्णयामुळे आश्चर्य वाटले नसल्याची प्रतिक्रियाही भारताने दिली आहे. अफगाणिस्थानबाबत पाकिस्तानची भूमिका काय आहे, हे साऱ्या जगाला माहिती आहे आणि भारतालाही याची पूर्ण कल्पना असल्याची प्रतिक्रिया सरकारकडून देण्यात आली आहे.
नवी दिल्ली – अफगाणिस्थानातील सत्ता बदल आणि आगामी आव्हाने, या विषयावर १० नोव्हेंबर रोजी जगातील काही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची (NSA)महत्त्वाची मिटंग नवी दिल्लीत होणार आहे. पाकिस्तानने यापूर्वीच या बैठकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. आता चीननेही NSAच्या मिटिंगला उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कळविले आहे. या मिटिंगच्या वेळापत्रकावर आक्षेप व्यक्त करत, चीनने दिल्लीत होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले आहे.
चीनने दिली भारताला याची माहिती
सोमवारी संध्याकाळी या मिटिंगमध्ये सहभागी होणार नसल्याचे चीनकडून सांगण्यात आले, त्यासाठीचे कारणमही चीनने दिले. मिटिंगच्या शेड्युलबद्दल काही आक्षेप आहेत, त्यामुळे या मिटिंगमध्ये चीनचे NSA उपस्थित राहणार नाहीत. याची माहिती भारताला देण्यात आली असल्याचेही चीनकडून सांगण्यात आले आहे. अफगाणिस्थानच्या मुद्द्यावर भारताशी चर्चा आणि सहकार्य करण्याची चीनची तयारी असल्याचेही चीनने स्पष्ट केल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. या मुद्द्यावर जेही बहुपक्षीय आणि द्वीपक्षीय मुद्दे असतील त्याबाबत सहकार्याचे आश्वासनही चीनने दिले आहे.
डोभालांच्या अध्यक्षतेत होणार मिटिंग
दिल्ली रिजनल सिक्युरिटी डायलॉग ऑन अफगाणिस्थान या मिटिंगचे आयोजन १० नोव्हेंबरला दिल्लीत करण्यात आले हे. भारातचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल या मिटिंगच्या अध्यक्षस्थानी असतील. पाकिस्तानने यात सामील होण्यास यापूर्वीच नकार दिला आहे. भारताने पाकिस्तानचा हा निर्णय दुर्भाग्यपूर्म असल्याचे म्हटले आहे. तसेच या निर्णयामुळे आश्चर्य वाटले नसल्याची प्रतिक्रियाही भारताने दिली आहे. अफगाणिस्थानबाबत पाकिस्तानची भूमिका काय आहे, हे साऱ्या जगाला माहिती आहे आणि भारतालाही याची पूर्ण कल्पना असल्याची प्रतिक्रिया सरकारकडून देण्यात आली आहे.
मिटांग तर होणारच
पाकिस्तान आणि चीन मिटिंगमध्ये सहभागी होणार नसले तरी ही बैठक ठरलेल्या वेळी होणारच आहे. यात इराण, रशिया, उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान यासह अन्य देशांचे NSA बैठकीला उपस्थित असणार आहेत. १५ ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्थानवर कब्जा केला आहे. त्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्थानची मदत सद्यस्थितीत स्थगित केली आहे. तालिबान सरकारला जगाची मान्यता मिळावी, यासाठी पाकिस्तान सरकार प्रयत्नशील आहे. मात्र जागतिक पातळीवर ही मान्यता मिळताना दिसत नाहीये.