अवैध दारू धंदयांना बसवण्यासाठी पहिलं आंतरराष्ट्रीय स्तरीय चेकिंग लेन तयार करणार- केजरीवाल

दिल्लीमध्ये गरजेपेक्षा २० टक्के अधिक दारुची दुकानं आहेत. एका गल्लीत अनेक दुकानं आहेत. शिवाय दिल्लीत असे अनेक मॉल्स आहेत, जिथे ८ ते १० दारूची दुकानं सहज आढळतात. शहरातील बनावट दारू धंद्यांना चाप बसवण्यासाठी भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय स्तरीय चेकिंग लेन तयार करणार. -केजरीवाल

    दिल्ली: केजरीवाल सरकारने एक्साइज पॉलिसीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. ज्यामुळे राजधानीतील अवैध दारूची दुकानं (illegal liquor shops) बंद करण्याबरोबरच दारूच्या दुकानांसाठी अनेक नवीन नियम जाहीर करण्यात येणार आहे. शहरातील बनावट दारू धंद्यांना चाप बसवण्यासाठी भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय स्तरीय चेकिंग लेन तयार करणार असल्याची माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे.

    या नवीन नियमांमुळे दारू व्यावसायिकांचा तोटा न होता आता उत्पादन शुल्क महसूलातही २० टक्के वाढ होणार असल्याची माहिती दिल्ली प्रशासनाने दिली आहेत. दिल्लीमध्ये गरजेपेक्षा २० टक्के अधिक दारुची दुकानं आहेत. याठिकाणी एका गल्लीत अनेक दुकानं आहेत. शिवाय दिल्लीत असे अनेक मॉल्स आहेत, जिथे ८ ते १० दारूची दुकानं सहज आढळतात. दिल्लीमध्ये गेल्या दोन वर्षात अवैध दारूच्या ७ लाख ९हजार बाटल्या जप्त केल्या आहेत. तर १८६४ एफआयआर दाखल करून १९३९ लोकांना अटक केली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी एक हजार वाहनंही जप्त केली आहेत.