टिकरी बॉर्डरवर शेतकरी साजरी करणार होळी, जाळणार कृषी कायद्यांच्या प्रती

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या प्रति जाळून होळी साजरी करण्याचा निर्णय आंदोलक शेतकऱ्यांनी घेतलाय. भारती किसान युनीयनचे नेते राकेश टिकैत हे कृषी कायद्यांच्या प्रति जाळून होळी साजरी करणार आहेत. आपण जिथे असू तिथे कृषी कायद्यांच्या प्रतिंची होळी करू आणि आपला या कायद्यांना असणारा विरोध दाखवून देऊ, असं त्यांनी जाहीर केलंय. शेतकऱ्यांनीदेखील जमेल तिथं कृषी कायद्यांची होळी करावी, असं आवाहन त्यांनी केलंय. 

    केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज (रविवार) १२२ वा दिवस आहे. केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करावेत आणि किमान हमीभावाच्या कायद्यात सुधारणा करावी या मागणीसाठी शेतकरी गेल्या वर्षीपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनादरम्यान होळीचा सणदेखील दिल्ली-पंजाब सीमेवरच साजरा होणार आहे.

    केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या प्रति जाळून होळी साजरी करण्याचा निर्णय आंदोलक शेतकऱ्यांनी घेतलाय. भारती किसान युनीयनचे नेते राकेश टिकैत हे कृषी कायद्यांच्या प्रति जाळून होळी साजरी करणार आहेत. आपण जिथे असू तिथे कृषी कायद्यांच्या प्रतिंची होळी करू आणि आपला या कायद्यांना असणारा विरोध दाखवून देऊ, असं त्यांनी जाहीर केलंय. शेतकऱ्यांनीदेखील जमेल तिथं कृषी कायद्यांची होळी करावी, असं आवाहन त्यांनी केलंय.

    केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनाचा आज १२२ वा दिवस आहे. केंद्र सरकार जोपर्यंत कायदे रद्द करत नाही, तोपर्यत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीय. सरकारने कायदे रद्द केले नाहीत, तर दिवाळीदेखील सीमेवरच साजरी करण्याची तयारी आम्ही केली असल्याचं टिकैत यांनी केलंय.

    दरवर्षी गुलाल आणि रंगांचा वापर करून होळी खेळण्यात येते. मात्र यंदा गुलाल किंवा रंगाचा वापर न करता मातीचा वापर करूनच होळी साजरी करण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलंय. एकमेकांना मातीचा टिळा लावून होळी साजरी करण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलंय. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यांना श्रद्धांजलीदेखील वाहिली जाणार आहे.