एअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार नवे वायुसेना प्रमुख, 1 ऑक्टोबरला स्विकारणार पदभार

राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे NDA विद्यार्थी असलेले एअर मार्शल चौधरी 29 डिसेंबर 1982 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत भरती झाले. 1 जुलै रोजी त्यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता.

    एअर मार्शल व्ही.आर. चौधरी नवे हवाईदल प्रमुख असतील. सध्याचे हवाई प्रमुख आरकेएस भदौरिया 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे हवाई दलाची पुढची सुत्र नांदेडचे सुपुत्र एअर मार्शल विवेक राम चौधरी सोपवत त्यांची हवाई दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

    या संदर्भातील माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. यात त्यांनी म्हटलंय की, “सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत असलेले एअर मार्शल व्ही आर चौधरी यांची पुढील हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते 1 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारतील.”

    राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे NDA विद्यार्थी असलेले एअर मार्शल चौधरी 29 डिसेंबर 1982 रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत भरती झाले. 1 जुलै रोजी त्यांनी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला होता.

    एअर मार्शल चौधरी यांना आतापर्यंत सेवेदरम्यान परम विशिष्ठ सेवा पदक, अति विशिष्ठ सेवा पदक आणि वायु सेना पदक देण्यात आले आहे. एअर मार्शल चौधरी यांना ३,८०० तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे आणि ते मिग -29 विमानांचे तज्ज्ञ आहेत. वेस्टर्न एअर कमांडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.