कोरोना लसीकरणाच्या ट्रायलमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचे आहे का? मग ही बातमी नक्का वाचा

दिल्ली : कोरोना लसीकरणाऱ्या ट्रायलमध्ये आता तुम्हीही सहभागी होऊ शकता. ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) याबाबत एक जाहिरातच प्रसिद्ध केली आहे.

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS) लवकरच कोव्हॅक्सीन (COVAXIN) लसीचं तीसरं ट्रायल सुरू करणार आहेत. यासाठी त्यांना स्वयंसेवकांची गरज आहे. यामुळे या ट्रायलमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
या संदर्भात एम्सने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. देशी कोरोना लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी व्हायचं असेल तर ३१ डिसेंबरला तुम्ही नाव नोंदणी करू शकता.

या जाहिरातीत एम्सने एक व्हॉट्सअ‍ॅप नंबर दिला आहे. या क्रमांकावर मेसेज करुन अथवा जाहिरातीमध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर मेल करूदेखील यात सहभाही होता येवू शकते. ही जाहिरात कोव्हॅक्सिन चाचणीकडे लक्ष असणाऱ्या प्रोफेसर डॉ. संजय राय यांनी प्रसिद्ध केली आहे.

कोव्हॅक्सिनची पहिली आणि दुसरी चाचणी (COVAXIN Trail) यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. आता या लसीची तीसरी चाचणी करण्यात येणार आहे.