गौतम गंभीरला धमकी देणारा ई-मेल पाकिस्तानातून

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केली होती. दोनवेळा गौतम गंभीरला धमकी देण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे. गौतम गंभीरला धमकीचा मेल पाकिस्तानातून आला होता(An e-mail threatening Gautam Gambhir from Pakistan).

    दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपा आमदार गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केली होती. दोनवेळा गौतम गंभीरला धमकी देण्यात आली होती. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात मोठा खुलासा झाला आहे.
    गौतम गंभीरला धमकीचा मेल पाकिस्तानातून आला होता(An e-mail threatening Gautam Gambhir from Pakistan).

    गौतम गंभीरने आरोप केला होता की त्याला आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. पण ज्या सिस्टीमद्वारे हा मेल पाठवला गेला त्याचा आयपी अॅकड्रेस पाकिस्तानमध्ये सापडला आहे.

    दिल्ली पोलिसांनी गुगलकडून माहिती मागवली होती. गुगलने दिलेल्या माहितीनुसार, गौतम गंभीरला धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता. पाकिस्तानचा आयपी अॅाड्रेसही सापडला आहे.