Ancestors of Shriram, Shrikrishna and Mahadev Muslims

भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव भारतीय मुसलमानांचे पूर्वज आहेत, त्यामुळे त्यांनी भारतीय भूमी आणि संस्कृतीला नमन करायला हवे, असे विधान उत्तरप्रदेशचे मंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी केले आहे.

    दिल्ली : भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव भारतीय मुसलमानांचे पूर्वज आहेत, त्यामुळे त्यांनी भारतीय भूमी आणि संस्कृतीला नमन करायला हवे, असे विधान उत्तरप्रदेशचे मंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी केले आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भारतीय मुस्लिम राष्ट्र बनवण्याची विचारधारा संपवून हिंदुत्व आणि हिंदुस्थानी संस्कृतीचा झेंडा सर्वत्र फडकावला, असेही ते म्हणाले. भारतामधील मुसलमानांचे पूर्वज भगवान श्रीराम, श्रीकृष्ण आणि महादेव आहेत. त्यामुळे त्यांना काबाला (मक्का मदीना) जाण्याची आवश्यकता नाही. येथील मुसलमानांनी भारतीय भूमि आमि संस्कृतीपुढे नतमस्तक व्हावे, असे शुक्ला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.भारतीय संस्कृतीचा जगभरात झेंडातसेच अफगाणिस्तान आणि सीरियासह विविध देशांमधील काही लोक संपूर्ण जगाला मुसनमान बनवण्याची इच्छा बाळगून होते.

    भारतातील काही लोकांचीही तशी विचारधारा होती, परंतु मोदी आणि योगीच्या केंद्र व राज्य सरकारने हिंदुत्व आणि भारतीय संस्कृतीचा झेंडा जगभरात फडकावून ही विचारधारा संपवली, असेही शुक्ला म्हणाले. अफगाणिस्तानमधील दहशतवाद्यांना समाजवादी पक्षाचे समर्थन मिळत आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क खुल्लम खुल्ला तालिबानचे समर्थन करत आहेत, असेही शुक्ला म्हणाले.

    तसेच असदुद्दीन ओवैसी यांची मागची पिढी हैदराबादला वेगळे राष्ट्र बनवणार होती, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अशी मानसिकता असणारी लोक आजही आहेत. हे लोक हलक्या काळजाची असून यांचे पूर्वज भीतीने मुसलमान बनले होते, असेही शुक्ला म्हणाले.