मुरलीधर राव यांची मध्य प्रदेशाच्या प्रभारी नियुक्ती ; मात्र राम माधवांची वर्णी कधी?

नवी दिल्ली: भाजपाचे सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांना पक्षातून हद्दपार केल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र बाजूला पडलेले महासचिव राम माधव यांच्या बाबतीत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुरलीधर राव यांना भाजप शासित मध्यप्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. सप्टेंबर महिन्यात भाजपमध्ये करण्यात आलेल्या फेरा बदलादरम्यान मुरलीधर राव, राम माधव यांना पदावरून हटवण्यात आले होते. दोघांचीही नियुक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून भाजपमध्ये आणण्यात आले होते. त्यांच्याकडून अधिक आशा व्यक्त केल्या जात होत्या. भाजपचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी राव यांच्यावर मेहरबानी केली परंतु माधव यांच्यावर अद्याप कृपादृषी झालेली नाही.

सद्यस्थितीला राम माधव आपल्या इंडिया फाऊंडेशन या ट्रस्टच्या माध्यमातून राजकीय व गैरराजकीय कामे चालू ठेवली आहेत. तसेच विविध वर्तमानपात्रतांमधूनही स्तभंलेखन करताना सरकारच्या कामाबाबत अप्रत्यक्षपणे प्रश्न चिन्ह तयार केले होते. राम माधव यांचे लक्ष सद्यस्थितीला कनार्टक येथे होणाऱ्या राजसभेची फेरनिवडणूकीवर आहे. मात्र राम माधव यांच्याबाबत असा व्यवहार का केला जात आहे हा प्रश्न मात्र अनुउत्तरीतच राहतोय.