‘स्पेशल २६’ स्टाईलने दरोडा, दरोडेखोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, असा उधळला डाव

दिल्लीत पाच जणांनी स्पेशल २६ सिनेमाप्रमाणे दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या पाच जणांनी दिल्लीतील एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून ३६ लाख रुपये, दागिने आणि परदेशी चलन लुटून नेलं. या प्रकरणी बिट्टू, सुरेंद्र आणि विभा या तिघांना अटक करण्यात आलीय. या दरोड्यातील इतर दोन आरोपी फरार आहेत. 

    एखाद्या सिनेमाचा कुणावर  आणि कसा प्रभाव पडेल, काही सांगता येत नाही. त्या प्रभावातून प्रत्यक्ष आयुष्यात घेतले गेलेले निर्णय अनेकदा अंगाशी आल्याचं आपण पाहतो. विशेषतः सिनेमात उदात्तीकरण केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांची पुनरावृत्ती प्रत्यक्ष आयुष्यात होताना आपण अनेकदा पाहतो. अशाच प्रकारे ‘स्पेशल २६’ सिनेमा पाहून दरोडा टाकण्याचा काही तरुणांचा प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगाशी आला.

    दिल्लीत पाच जणांनी स्पेशल २६ सिनेमाप्रमाणे दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. या पाच जणांनी दिल्लीतील एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून ३६ लाख रुपये, दागिने आणि परदेशी चलन लुटून नेलं. या प्रकरणी बिट्टू, सुरेंद्र आणि विभा या तिघांना अटक करण्यात आलीय. या दरोड्यातील इतर दोन आरोपी फरार आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे पाच जण सीबीआय अधिकारी बनून प्रितमपुरा भागातील प्रियांक अग्रवाल नावाच्या एका डॉक्टरच्या घरात घुसले आणि त्यांनी रोख रक्कम, दागिने आणि परदेशी चलन जप्त करत असल्याचं सांगितलं. अग्रवाल हे त्यांच्या वडिलांना घेऊन हॉस्पिटलमधून घरी पोहोचले. त्याचवेळी पाच जण जबरदस्तीनं त्यांच्या घरात घुसले. आपण सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांनी घरातल्या सर्वांचे मोबाईल हिसकावून घेतले आणि घराची झडती घेतली.

    घरातील सामानाची चोरी केल्यानंतर त्यांनी डॉक्टरांना क्लिनिकमध्येही येण्यास सांगितलं. तिथलीही झडती घेणार असल्याचं ते म्हणाले. क्लिनिककडं जात असताना पोलिसांची गाडी पाहून डॉक्टरांच्या ड्रायव्हरने जोरदार आरडाओरडा करत मदतीची याचना केली. त्या प्रसंगाने पाचही जणांनी घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून या पाचही जणांना ताब्यात घेतलं.