व्हॉट्सअ‍ॅप येणारा amazon च्या फ्री गिफ्टचा मेसेज ठरू शकतो घात ; जाणून घ्या ही माहिती

तज्ज्ञांच्या मते हा एक बनावट संदेश आहे. जेथे सायबर गुन्हेगार आपले वैयक्तिक तपशील शोधण्यासाठी, कॉल करण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी या डेट्याचा वापर केला जाऊ शकतो. कारण अ‍ॅमेझॉनने याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांच्या साईटवर यासंबंधी कोणतीही जाहिरात नाही.

    नवी दिल्ली: एक फेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये अ‍ॅमेझॉन आपल्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त मोफत भेटवस्तू देणार असल्याचे या मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे.महत्त्वाचे म्हणजे भेट म्हणून कंपनी स्मार्टफोन देऊ करत आहे. अनेक यूजर्सना हा मेसेज मिळाला आहे. www.amazon.com वर प्रत्येकासाठी एक मोफत भेट आहे अशा मेसेजमुळे नेटकरीही आनंदी होऊन लिंकवर क्लिक करत आहेत. पण याबद्दल एक धक्कादायक सत्य समोर आले आहे.
    जेव्हा यूजर्स या मेसेजवर क्लिक करतात तेव्हा “अभिनंदन, आमच्या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी आपली निवड झाली आहे. ‘आजच्या मोफत भेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे ‘Huawei Mate 40 Pro 5G Full Netcom 8GB +’ . दर बुधवारी आम्ही याप्रमाणे १०० वापरकर्ते निवडतो आणि त्यांना आश्चर्यकारक बक्षिसे जिंकण्याची संधी देतो. या सर्वेक्षणचा हेतू आमच्या वापरकर्त्यांचा आहे.

    अ‍ॅमेझॉन सर्वेक्षणांद्वारे वापरकर्त्यांसाठी सर्विस क्वालिटी सुधारण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सर्वेक्षण करण्यासाठी टाइमर सेट केला आहे. ज्यात लिंग, वय, अ‍ॅमेझॉन सर्व्हिस क्वालिटी आणि ती व्यक्ती वापरत असलेले स्मार्टफोन प्लॅटफॉर्म असे चार प्रश्न आहेत. ही माहिती दिल्यानंतर, वापरकर्त्यांना मोफत भेट घेण्यासाठी एक बॉक्स उघडावा लागेल. ज्यानंतर त्याला हा संदेश पाच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप किंवा इतर २० मित्रांसह सामायिक करण्यास सांगितले जाते.

    तज्ज्ञांच्या मते हा एक बनावट संदेश आहे. जेथे सायबर गुन्हेगार आपले वैयक्तिक तपशील शोधण्यासाठी, कॉल करण्यासाठी आणि फसवणूक करण्यासाठी या डेट्याचा वापर केला जाऊ शकतो. कारण अ‍ॅमेझॉनने याबद्दल अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यांच्या साईटवर यासंबंधी कोणतीही जाहिरात नाही.  या प्रकारचे मेसेजवर करणे टाळण्याचे आवाहन सायबर तज्ञानी केले आहे. हे सायबर गुन्हेगारांचे जाळे असू शकते. हॅकर्स आपला फोन किंवा कंम्प्यूटर हॅक करण्यासाठी याचा वापर करू शकतात.