Division of Jammu and Kashmir into two states; All-party meeting with the Prime Minister

जम्मू काश्मीरातील सर्वपक्षीय नेत्यांची 24 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. कलम 370 हटविण्यात आल्यानंतर प्रथमच ही बैठक होत असल्याने तसेच मोदी सरकारमधील वरिष्ठ मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने जम्मू काश्मीरची दोन राज्यात विभागणी होण्याचीही चर्चा सुरू झाली असली तरी सर्व अफवा आणि चर्चा चुकीच्या तसेच निराधार असून राज्याचे विभाजन केले जाणार नसल्याचे सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

  दिल्ली : जम्मू काश्मीरातील सर्वपक्षीय नेत्यांची 24 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत आहे. कलम 370 हटविण्यात आल्यानंतर प्रथमच ही बैठक होत असल्याने तसेच मोदी सरकारमधील वरिष्ठ मंत्रीही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याने जम्मू काश्मीरची दोन राज्यात विभागणी होण्याचीही चर्चा सुरू झाली असली तरी सर्व अफवा आणि चर्चा चुकीच्या तसेच निराधार असून राज्याचे विभाजन केले जाणार नसल्याचे सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

  अफवांचे खंडण

  जम्मू-काश्मीरमध्ये सुरू झालेल्या वेगवान हालचाली पाहू जाता जम्मूला पूर्ण राज्याचा दर्जा तर काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणूनच ठेवले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. यासोबतच दक्षिण आणि उत्तर काश्मीर वेगळं आणि श्रीनगर वेगळे केले जाईल, अशीही चर्चा आहे. या सर्व चर्चांचे आणि अफवांचे सरकारी सूत्रांनी खंडण केले.

  विधानसभा निवडणुकांचे वेध!

  जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक घेण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न असल्याचे समजते. या वर्षअखेरीस डिसेंबरमध्ये अथवा पुढील वर्षी मार्च अथवा एप्रिलमध्ये विधानसभा निवडणुकाही होण्याची चर्चा आहे. निवडणुकांपूर्वीच जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून त्यासाठीच सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित केल्याचीदेखील चर्चा आहे.

  मेहबुबांचा नकार, फारूख जाणार बैठकीला

  24 रोजी होत असलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्यास पीडीपी अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी नकार दिला असल्याचे समजते. तथापि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला मात्र ‘गुपकार गटाचे नेते म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात पीडीपीच्या राजकीय प्रकरणांच्या समितीची बैठक झाली. दरम्यान पीडीपी प्रवक्ते सैयद सुहैल बुखारी यांनी याबाबतचा अंतिम निर्णय मेहबुबाच घेणार असल्याचे स्पष्ट केले.

  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्यात रविवारी हायव्होल्टेज बैठक पार पाडली. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि अजित डोवालही उपस्थित होते. बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप कळालेले नाही, परंतु जम्मू कश्मीर आणि मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  जून महिन्याच्या सुरूवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी अनेक मंत्रालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच विविध मंत्र्यांसोबत पाच वेळा बैठक घेतली. आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल किंवा विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यावर या बैठकीच चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच 24 जून रोजी पंतप्रधान मोदी जम्मू कश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करणार आहेत. म्हणून जम्मू कश्मीरबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  हे सुद्धा वाचा