Book a direct train for the picnic now; Railway Minister approves to run 'theme base' train

एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला पर्यटनासाठी थेट रेल्वेच बूक करायची असेल तर ते करता येणार आहे. कारण आता रेल्वे तुम्ही भाड्याने घेता येणार आहे यासंदर्भात रेल्वे रेल्वे मंत्रालयाने ‘भारत गौरव’ नावाच्या योजनेची घोषणा केली आहे(Book a direct train for the picnic now; Railway Minister approves to run 'theme base' train). ‘थीम बेस’ रेल्वे चालवायला रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली. या योजनेंतर्गत पर्यटनासाठी अशा गाड्या चालविल्या जाणार आहेत.

    दिल्ली : एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला पर्यटनासाठी थेट रेल्वेच बूक करायची असेल तर ते करता येणार आहे. कारण आता रेल्वे तुम्ही भाड्याने घेता येणार आहे यासंदर्भात रेल्वे रेल्वे मंत्रालयाने ‘भारत गौरव’ नावाच्या योजनेची घोषणा केली आहे(Book a direct train for the picnic now; Railway Minister approves to run ‘theme base’ train). ‘थीम बेस’ रेल्वे चालवायला रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली. या योजनेंतर्गत पर्यटनासाठी अशा गाड्या चालविल्या जाणार आहेत.

    रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ‘भारत गौरव’ ची घोषणा करताना सांगितले की, सध्या जवळपास दीडशे ट्रेन्स ह्या अशा भाड्यावर दिल्या जाणार आहेत म्हणजेच तीन हजारापेक्षा जास्त कोचेस असतील. एका ट्रेनला 14 ते 20 कोचेस जोडले जातील.

    सध्या जी रामायणा एक्स्प्रेस चालवली जातेय, ती भारत गौरव अंतर्गतच आहे. तसच गुरुकृपा एक्स्प्रेस, सफारी एक्स्प्रेस, साऊथ इंडिया दर्शन या ट्रेन्सही खासगी व्यक्ती किंवा संस्था चालवणार आहेत. 12 ज्योतिर्लिंग, वेगवेगळे अभयरण्या दरम्याणही ह्या गाड्या चालवता येतील.