covishield vaccine

कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या संशोधनात कोविशिल्डचे दोन्ही डोस घेणाऱ्या 16.1% व्यक्तींमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात अँडीबॉडीजच तयार झाली नसल्याचे आणि एक डोस घेतलेल्या 58.1 टक्के व्यक्तीमध्ये अँटीबॉडीजच तयार झाली नसल्याचे आढळले आहे.

  दिल्ली : कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या संशोधनात धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. या संशोधनात कोविशिल्डचे दोन्ही डोस घेणाऱ्या 16.1% व्यक्तींमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात अँडीबॉडीजच तयार झाली नसल्याचे आणि एक डोस घेतलेल्या 58.1 टक्के व्यक्तीमध्ये अँटीबॉडीजच तयार झाली नसल्याचे आढळले आहे.

  दरम्यान, अँटीबॉडीज न दिसणे आणि अँटीबॉडी नसणे दोन्ही एकच बाबी नाहीत असे मत मायक्रोबायोलॉजीचे माजी प्रमुख डॉ. जेकब जॉन यांनी सांगितले. अँटीबॉडीज असावी पण आढळली नसेल असे सांगत तरीही व्यक्तिचे बाधित होण्यापासून संरक्षण होऊ शकेल, असे ते म्हणाले.

  बुस्टर डोसची गरज

  संशोधनासाठी ज्या व्यक्तींचे नमुने घेण्यात आले होते ते स्वस्थ व्यक्तींचे होते, अथवा जे वृद्ध आहेत आणि आधीच गंभीर आजार असतील त्यामुळेच अँटीबॉडीज आढळली नसेल, असे जॉन म्हणाले. दरम्यान जे व्यक्ती मधुमेह, हायपरटेंशन, हार्ट, लंग्स आणि किडनीच्या आजाराचा सामना करीत आहेत त्यांना तिसरा डोसही द्यायला हवा, असे ते म्हणाले. भारतात काही लोकांना कोविशिल्डच्या बुस्टर डोसचीही गरज भासू शकते असेही ते म्हणाले.

  संशोधनातील निष्कर्ष

  • अँटीबॉडीमध्ये जे टायट्रेस असतात, जे कोरोनाचा नाश करतात, त्यांचे प्रमाण डेल्टा व्हेरिएंटवर मात करण्याच्या तुलनेत कमी होते.
  • पहिल्या बी 1 व्हेरिएंट विरोधात अँटीबॉडीज टायट्रेस लसीचा एक डोस घेणाऱ्या व्यक्तींमध्ये 78% कमी, दोन डोस घेणाऱ्यांमध्ये 69% कमी होते.
  • याशिवाय बाधित झालेल्या व एक डोस घेणाऱ्या व्यक्तींमध्ये 66% कमी होते. यासोबतच जे बाधित झाले होते आणि त्यांनी दोन्ही डोस घेतले होते त्यांच्यात 38% कमी होते.